Jasprit Bumrah’s video goes viral after dismissing Ben Duckett : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठी चूक केली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे न ऐकणे रोहित शर्माला महागात पडले. कारण बुमराह वारंवार बोलत असतानाही रोहित शर्माने बुमराहचे ऐकले नाही आणि त्याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागले. ही चूक खूप महागात पडू शकली असती, पण बुमराहने त्याच्या पुढच्याच षटकात चूक सुधारली. रोहित शर्माने कोणती चूक केली होती, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहितने काय चूक केली?

इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने १० गडी गमावून ४३६ धावा केल्या आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने शानदार खेळ करण्यास सुरुवात केली. इंग्लंडने केवळ एक विकेट गमावून १०० धावांचा टप्पा ओलांडला होता. भारताला विकेट्सची नितांत गरज होती, इंग्लंडचे फलंदाज मैदानावर तळ ठोकून बसले होते. अशात जसप्रीत बुमराह १७ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने एक कठीण चेंडू बेन डकेटकडे टाकला. चेंडू फलंदाजाच्या पॅडला लागला आणि बुमराहने जोरदार अपील केलr, पण तरीही अंपायरने आऊट दिले नाही. बुमराहने रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्यास सांगितले, पण रोहितने यष्टीरक करणाऱ्या केएस भरतशी बोलून रिव्ह्यू घेण्यास नकार दिला.

जसप्रीत बुमराहने रोहितची चूक सुधारली –

बुमराहने अनेकदा सांगितल्यानंतरही रोहितने अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत रिव्ह्यू घेतला नाही. त्यानंतर रिप्लेमध्ये दिसले बेन डकेट एलबीडब्ल्यू आऊट होता. कारण पॅडला लागल्यानंतर चेंडू यष्टीवर आदळत होता. अशाप्रकारे रोहित शर्माने बुमराहचे न ऐकून चूक केली. बुमराहच्या विनंतीवरून रोहितने रिव्ह्यू घेतला असता, तर डकेट लवकर बाद होऊ शकला असता. मात्र, नंतर बुमराहने १९व्या षटकात थेट डकेटला क्लीन बोल्ड केले. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने डकेटला वैयक्तिक ४७ धावांच्या स्कोअरवर बाद केले.

हेही वाचा – IND vs ENG : ‘आधी पॅड की बॅट…’, रवींद्र जडेजाच्या एलबीडब्ल्यू आऊटवरुन निर्माण झाला गोंधळ

भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १९० धावांची आघाडी –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४३६ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने १९० धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, केएस भरत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली.