In;dia vs England t20 Live Updates, 09 July 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आज (९ जुलै) बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर झाला. ४९ धावांनी भारताने हा सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून २० षटकांमध्ये आठ बाद १७० धावा केल्या होत्या. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून इंग्लंडला सर्वबाद २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने मालिकेतील पहिला सामनादेखील ५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकलेला आहे.

Live Updates

England vs India 2nd T20 Live Update : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी २० सामन्याच्या सर्व लाइव्ह अपडेट्स

22:22 (IST) 9 Jul 2022
भारताने सामन्यासह मालिका जिंकली

भारताने इंग्लंडच्या संघाला १२१ धावांमध्ये गुंडाळले. या विजयासह भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

22:11 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचा नववा गडी बाद

रिचर्ड ग्लीसनच्या रुपात इंग्लंडचा नववा गडी बाद झाला. भारताचा विजय दृष्टीपथात आला आहे.

22:05 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचा आठवा गडी स्वस्तात तंबूत

इंग्लंडचा आठवा गडी स्वस्तात तंबूत परतला आहे. क्रिस जॉर्डन अवघी एक धाव करून धावबाद झाला.

22:04 (IST) 9 Jul 2022
मोईन अलीच्या रुपात सातवा गडी बाद

डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोईन अलीला हार्दीक पंड्याने माघारी धाडले आहे. अलीने २१ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.

22:02 (IST) 9 Jul 2022
मोईन अलीचा डाव सावरण्याचा प्रयत्न

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने दोन षटकार ठोकले.

21:56 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचा संघ बॅकफुटवर

सुरुवातीचे सहा फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे इंग्लंड बॅकफुटवर गेला आहे. विजयासाठी ४४ चेंडूत १०१ धावा आवश्यक आहेत.

21:48 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचा सहावा गडी बाद

भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला संकटात आणले आहे. जसप्रीत बुमराहने सॅम कुरेनच्या रुपात यजमानांना सहावा झटका दिला.

21:46 (IST) 9 Jul 2022
१० षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद ५९ धावा

झटपट गडी बाद झाल्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे. पहिल्या १० षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद ५९ धावा झाल्या आहेत.

21:42 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचा पाचवा गडी माघारी

डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडचा पाचवा गडी बाद झाला. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलने त्याचा झेल घेतला. इंग्लंडची अवस्था पाच बाद ५५ अशी झाली आहे.

21:37 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण

नवव्या षटकामध्ये इंग्लंडचे अर्धशतक धाव फलकावर लागले. मोईन अली (५) आणि डेव्हिड मलान (१७) खेळपट्टीवर आहेत.

21:30 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली

यजमानांना हॅरी ब्रुकच्या रुपात चौथा झटका बसला आहे. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजी सुर्यकुमार यादवने त्याचा झेल टिपला. हॅरीने आठ धावा केल्या.

21:26 (IST) 9 Jul 2022
पावर प्लेमध्ये इंग्लंडच्या तीन बाद ३६ धावा

पावर प्लेमध्ये इंग्लंडने तीन बाद ३६ धावांपर्यंत मजल मारली आहे.

21:20 (IST) 9 Jul 2022
पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद २७ धावा

१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यजमानांची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद २७ धावा झाल्या आहेत.

21:17 (IST) 9 Jul 2022
जसप्रीत बुमराहचा इंग्लंडला तिसरा धक्का

लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपात यजमानांचा तिसरा गडी बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचित केले. इंग्लंडची अवस्था तीन बाद २७ अशी झाली आहे.

21:12 (IST) 9 Jul 2022
लिव्हिंगस्टोनला जीवदान

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टोनला जीवदान मिळाले. युझवेंद्र चहलने त्याचा झेल सोडला.

21:07 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडचा दुसरा गडी बाद

इंग्लंडचा कर्णधार जोस बटरल चार धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पंतने त्याचा झेल घेतला. इंग्लंडच्या दोन बाद ११ धावा झाल्या आहेत.

20:54 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडला पहिला झटका

भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला शून्यावर बाद केले. रोहित शर्माने जेसनचा झेल घेतला.

20:52 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुवात

इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून सलामीवीर जोस बटलर आणि जेसन रॉय मैदानात आले आहेत.

20:43 (IST) 9 Jul 2022
इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य

भारताने प्रथम फलंदाजी करून २० षटकांमध्ये आठ बाद १७० धावा केल्या आहेत.

20:27 (IST) 9 Jul 2022
हर्षल पटेल बाद

फटकेबाजी करण्याच्या नादात हर्षल पटेल बाद झाला. त्यापूर्वी त्याने क्रिस जॉर्डनच्या ७१ मीटर लांबीचा षटकार ठोकला होता. भारताची अवस्था सात बाद १४५ झाली आहे.

20:19 (IST) 9 Jul 2022
दिनेश कार्तिकच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद

भारतीय फलंदाजी ढेपाळली असून दिनेश कार्तिकच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद झाला. भारताची अवस्था सहा बाद १२२ अशी झाली आहे.

20:18 (IST) 9 Jul 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद ११५ धावा

१५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद ११५ धावा झाल्या आहेत. दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजा मैदानावरती उपस्थित आहेत.

19:57 (IST) 9 Jul 2022
भारतीय फलंदाजी ढेपाळली

सुर्यकुमार यादव पाठोपाठ हार्दिक पंड्यादेखील बाद झाला. क्रिस जॉर्डनने त्याला माघारी पाठवले. भारताची अवस्था पाच बाद ८९ अशी झाली आहे.

19:54 (IST) 9 Jul 2022
सुर्यकुमार यादवच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद

सुर्यकुमार यादवच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. क्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर सॅम कुरेनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. भारताच्या १० षटकांमध्ये चार बाद ८९ धावा झाल्या आहेत.

19:48 (IST) 9 Jul 2022
सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न

सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. दहाव्या षटामध्ये यादवने सलग दोन चौकार लगावले.

19:34 (IST) 9 Jul 2022
भारताचा तिसरा गडी बाद

इंग्लंडच्या रिचर्ड ग्लीसनने भारताला सलग तिसरा धक्का दिला आहे. ऋषभ पंत २६ धावा करून बाद झाला. भारताची धावसंख्या तीन बाद ६१ अशी आहे.

19:33 (IST) 9 Jul 2022
विराट कोहलीची पुन्हा निराशा

विराट कोहली एक धाव करून बाद झाला. रिचर्ड ग्लीसनने त्याचा बळी घेतला. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या ग्लीसनसाठी ही मोठी कामगिरी ठरली.

19:28 (IST) 9 Jul 2022
भारतीय संघाचे अर्धशतक पूर्ण

भारतीय सलामीवीरांच्या फटकेबाजीमुळे सहव्या षटकामध्ये भारताने अर्धशतक फलकावर लावले आहे.

19:25 (IST) 9 Jul 2022
भारताला पहिला झटका

रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला झटका बसला. रिचर्ड ग्लीसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने २० चेंडूत ३१ धावांची खेळी केली.

19:20 (IST) 9 Jul 2022
रोहित शर्माचे ३०० टी २० चौकार पूर्ण

भारतीय कर्णधार रोहित शर्माचे टी २० क्रिकेटमधील ३०० चौकार पूर्ण झाले. असे करणारा तो जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज ठरला आहे.

Story img Loader