In;dia vs England t20 Live Updates, 09 July 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आज (९ जुलै) बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर झाला. ४९ धावांनी भारताने हा सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून २० षटकांमध्ये आठ बाद १७० धावा केल्या होत्या. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून इंग्लंडला सर्वबाद २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने मालिकेतील पहिला सामनादेखील ५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

England vs India 2nd T20 Live Update : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी २० सामन्याच्या सर्व लाइव्ह अपडेट्स

19:16 (IST) 9 Jul 2022
तीन षटकांमध्ये भारत बिनबाद ३२

भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे.
पहिल्या तीन षटकांमध्ये भारत बिनबाद ३२वर पोहचला आहे.

19:12 (IST) 9 Jul 2022
रोहित शर्माची फटकेबाजी सुरू

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरूवात केली आहे. दोन षटकार ठोकले आहेत.

19:02 (IST) 9 Jul 2022
भारतीय फलंदाजीला सुरुवात

भारतीय फलंदाजीला सुरुवात झाली असून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सलामीला आले आहेत.

18:37 (IST) 9 Jul 2022
भारतीय संघात चार तर यजमान संघात दोन बदल

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल.

इंग्लंडचा संघ: जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरेन, क्रिस जॉर्डन, मॅट पार्किंसन, डेव्हिड विली, रिचर्ड ग्लीसन.

18:33 (IST) 9 Jul 2022
नाणेफेक जिंकून इंग्लंड करणार गोलंदाजी

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:25 (IST) 9 Jul 2022
बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडचे राज्य!

बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडने आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळलेले आहेत. हे तिन्ही सामने इंग्लंडने जिंकलेले आहेत.

18:03 (IST) 9 Jul 2022
बर्मिंगहॅममधील मैदानावर होणार लढत

बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर दुसरी टी २० लढत होणार आहे. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी दोन्ही संघ कसोटी सामना खेळले होते.

17:59 (IST) 9 Jul 2022
विराट आणि रोहितचे एकाच विक्रमावर लक्ष

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना ३०० टी २० चौकारांचा टप्पा ओलांडण्यासाठी दोन चौकारांची आवश्यकता आहे.