India vs England t20 Updates, 10 July 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१० जुलै) झाला. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती झालेली ही लढत इंग्लंडने१७ धावांनी जिंकला आहे . इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून सात बाद २१५ धावा केल्या होत्या. विजयासाठी २० षटकांमध्ये २१६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. तीन सामन्यांची मालिका भारताने २-१अशी जिंकली. आजचा सामना जिंकून यजमानांनी वाचवला व्हाईट वॉश टाळला आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवची शतकी खेळी ही या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

Live Updates

England vs India 3rd T20 Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स

22:49 (IST) 10 Jul 2022
भारताचा १७ धावांनी पराभव

तिसऱ्या टी २० सामन्यात भारताचा १७ धावांनी पराभव झाला.

22:48 (IST) 10 Jul 2022
भारताच्या १९८ धावा

भारताला निर्धारित २० षटकांमध्ये ९ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताचा १७ धावांनी पराभव झाला.

22:39 (IST) 10 Jul 2022
शेवटच्या षटकामध्ये भारताला २१ धावांची आवश्यकता

शेवटच्या षटकामध्ये भारताला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता आहे.

22:37 (IST) 10 Jul 2022
सुर्यकुमार यादव बाद

सुर्यकुमार यादव बाद झाला आहे. त्याने ५५ चेंडूमध्ये ११७ धावांची शानदार खेली केली. भारताच्या सात बाद १९१ धावा झाल्या आहेत.

22:35 (IST) 10 Jul 2022
सामना रंगतदार स्थितीमध्ये

सामना रंगतदार स्थितीमध्ये आला आहे. सुर्यकुमार यादव जोरदार फटकेबाजी करत आहे. मोईन अलीच्या षटकामध्ये त्याने चौफेर फटकेबाजी केली.

22:30 (IST) 10 Jul 2022
रविंद्र जडेजा बाद

रविंद्र जडेजाच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद झाला आहे. जडेजा सात धावा करून ग्लीसनच्या गोलंदाजीवर पायचित झाला.

22:24 (IST) 10 Jul 2022
भारताचा पाचवा गडी बाद

दिनेश कार्तिकच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद झाला आहे. कार्तिक सहा धावा करून बाद झाला.

22:21 (IST) 10 Jul 2022
सुर्यकुमार यादवचे धमाकेदार शतक

भारताचा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यावदवे शानदार शतक झळकावले आहे. त्याने केवळ ४८ चेंडूंमध्ये शतकी खेळी केली. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील पहिले शतक ठरले.

22:14 (IST) 10 Jul 2022
भारताला चौथा झटका

खेळ पट्टीवर जम बसवलेला श्रेयस अय्यर २८ धावा करून बाद झाला आहे. त्याने यादवसोबत मिळून शतकीय भागीदारी केली.

22:12 (IST) 10 Jul 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद १५० धावा

१५ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद १५० धावा झाल्या आहेत. सुर्यकुमार यादव (९३) आणि श्रेयस अय्यरने (२८) भारताला पुन्हा फ्रंटफुटवर आणले आहे.

22:00 (IST) 10 Jul 2022
सुर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक

सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला आहे. यादवने शानदार अर्धशतक झळकावले आहे.

21:38 (IST) 10 Jul 2022
सुर्यकुमार यादवची फटकेबाजी सुरू

सुरुवातीचे तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. यादवने फटकेबाजी सुरू केली आहे. भारताच्या ९ षटकांमध्ये ७१ धावा झाल्या आहेत.

21:30 (IST) 10 Jul 2022
भारताच्या ५० धावा पूर्ण

भारतीय संघाचे अर्धशतक पूर्ण झाले असून सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यस डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

21:20 (IST) 10 Jul 2022
कर्णधार रोहित शर्मा बाद

२१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्माच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला. रोहित ११ धावा करून माघारी गेला.

21:11 (IST) 10 Jul 2022
तीन षटकांमध्ये भारताच्या दोन बाद १४ धावा

पहिल्या तीन षटकांमध्ये भारताच्या दोन बाद १४ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आणि विराट कोहली झटपट बाद झाले आहेत.

21:08 (IST) 10 Jul 2022
विराट कोहलीच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद

विराट कोहली फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. त्याने सहा चेंडूंमध्ये ११ धावा केल्या.

21:01 (IST) 10 Jul 2022
ऋषभ पंतच्या रुपात भारताला पहिला झटका

सलामीवीर ऋषभ पंतच्या रुपात भारताला पहिला झटका बसला आहे. पंत एक धाव करून बाद झाला. भारताची अवस्था एक बाद २ धावा अशी झाली आहे.

20:55 (IST) 10 Jul 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारताच्या फलंजीला सुरुवात झाली असून रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने डावाची सुरुवात केली आहे.

20:45 (IST) 10 Jul 2022
२० षटकांमध्ये इंग्लंडच्या सात बाद २१५ धावा

२० षटकांमध्ये इंग्लंडच्या सात बाद २१५ धावा झाल्या आहेत. भारताला विजयासाठी २१६ धावांची आवश्यकता असेल.

20:38 (IST) 10 Jul 2022
इंग्लंडचा सहावा गडी बाद

हॅरी ब्रुकच्या रुपात इंग्लंडचा सहवा गडी माघारी गेला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रवी बिश्नोईने त्याचा झेल घेतला.

20:31 (IST) 10 Jul 2022
१८ षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद १९० धावा

१८ षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद १९० धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

20:26 (IST) 10 Jul 2022
इंग्लंडचा पाचवा गडी बाद

इंग्लंडचा मोईन अली शून्यावर बाद झाला. रवी बिश्नोईने यजमानांचा पाचवा गडी बाद केला. एकाच षटकात रवीचा हा दुसरा बळी ठरला.

20:24 (IST) 10 Jul 2022
डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडचा चौथा गडी बाद

डेव्हिड मलानच्या रुपात इंग्लंडचा चौथा गडी बाद झाला. मलानने ३९ चेंडूंत ७७ धावांची शानदार खेळी केली.

20:14 (IST) 10 Jul 2022
१५ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १५२ धावा

१५ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १५२ धावा झाल्या आहेत. डेव्हिड मलान ७७ धावांवर पोहचला आहे.

20:04 (IST) 10 Jul 2022
१३ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १२५ धावा

डेव्हिड मलानच्या अर्धशतकाच्या बळावर १३ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत.

20:02 (IST) 10 Jul 2022
डेव्हिड मलानचे अर्धशतक पूर्ण

डेव्हिड मलानने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील १२वे अर्धशतक ठरले.

19:49 (IST) 10 Jul 2022
हर्षल पटेलने इंग्लंडचा तिसरा गडी बाद केला

फिलीप साल्टच्या रूपात इंग्लंडला तिसरा झटका बसला आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. इंग्लंडच्या तीन बाद ८४ धावा झाल्या आहेत.

19:42 (IST) 10 Jul 2022
डेव्हिड मलानची फटकेबाजी सुरू

डेव्हिड मलानने फटकेबाजी सुरू केली आहे. १२ चेंडूंमध्ये त्याने २२ धावा केल्या आहेत.

19:36 (IST) 10 Jul 2022
इंग्लंडचा दुसरा गडी बाद

आठव्या षटकामध्ये इंग्लंडला दुसरा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकने जेसन रॉयला २७ धावांवर माघारी धाडले.

19:30 (IST) 10 Jul 2022
पावरप्लेमध्ये इंग्लंडच्या एक बाद ५२ धावा

पावरप्लेच्या सहा षटकांंमध्ये इंग्लंडच्या एक बाद ५२ धावा झाल्या आहेत.

Story img Loader