India vs England t20 Updates, 10 July 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१० जुलै) झाला. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती झालेली ही लढत इंग्लंडने१७ धावांनी जिंकला आहे . इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून सात बाद २१५ धावा केल्या होत्या. विजयासाठी २० षटकांमध्ये २१६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. तीन सामन्यांची मालिका भारताने २-१अशी जिंकली. आजचा सामना जिंकून यजमानांनी वाचवला व्हाईट वॉश टाळला आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवची शतकी खेळी ही या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
England vs India 3rd T20 Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स
पाच षटकांमध्ये इंग्लंड एक बाद ४५ धावांपर्यंत पोहचला आहे. डेव्हिड मलान आणि जेसन रॉय मैदानावरती उपस्थित आहेत.
इंग्लंडचा पहिला जोस बटलरच्या रुपात पहिला झटका बसला. जोस बटलर १८ धावा करून बाद झाला.
सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी सावध सुरुवात केली आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये इंग्लंडच्या बिनबाद १९ धावा झाल्या आहेत.
इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून दोन्ही सलामीवीर मैदानात आले आहेत. आवेश खानच्या हाती पहिले षटक देण्यात आले आहे.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक, रवी बिश्नोई.
इंग्लंडचा संघ: जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, फिलीप साल्ट, हॅरी ब्रुक, मोईन अली, डेव्हिड विली, क्रिस जॉर्डन, रीस टॉपली, रिचर्ड ग्लीसन.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टी २० क्रिकेटमध्ये इंग्लंडला घरच्या मैदानावर कधीही व्हाईट वॉश मिळालेला नाही.