Rinku Singh’s emotional post for Dhruv Jurel : रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंड दुसऱ्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली. मात्र, युवा ध्रुव जुरेलने तळातील फलंदाजांसह भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे अवघ्या १० धावांनी शतक हुकले. जुरेलच्या या खेळीनंतर भारताचा युवा सिक्सर किंग रिंकू सिंगने कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवा फलंदाज ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक झळकवण्यात अपयशी ठरला असला, तरी तो सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे. त्याने आपल्या ९० धावांच्या खेळीदरम्यान पहिल्यांदा कुलदीप यादवसह ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आकाश दीप फलंदाजीला आला आणि त्याने जुरेलबरोबर ४० धावांची भागीदारी केली. आता त्याच्या खेळीबद्दल त्याचा सहकारी रिंकू सिंगने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

रिंकू सिंगने ध्रुवसाठी इन्स्टावर एक फोटो शेअर करतना लिहिले ‘माझ्या भावा, स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे.’ रिंकू सिंग आणि ध्रुव जुरेल खूप चांगले मित्र आहेत. दोघेही कधी कधी एकाच खोलीत राहत असत. जुरेलने एका मुलाखतीत असेही सांगितले होते की, जेव्हा रिंकूने आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध एका षटकात ५ षटकार मारुन सामना जिंकवला होता, तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याने त्याला फोन केला होता आणि विचारले कसे वाटले.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : ‘अंपायर्स कॉल’मुळे भारताचे मोठे नुकसान, तब्बल सात निर्णय टीम इंडियाच्या विरोधात

टीम इंडियाने एकवेळ १७७ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. येथून जुरेलने भारताचा डाव शेवटपर्यंत सांभाळला. त्याने तळातील फलंदाजांसह महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारतीय संघाला सन्मानजनक स्थितीत नेले. त्याच्या खेळीमुळेच टीम इंडिया ३०० धावांचा टप्पा पार करू शकली. रांची कसोटीत भारताने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या. भारतासाठी जुरेलने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने १४९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ९० धावा केल्या. त्याला टॉम हार्टलीने बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 4th test after dhruv jurels innings of 90 runs rinku singh said my brother its time to realize the dream vbm