Due to the umpire’s call India suffered : भारत आणि इंग्लंड यांच्यातील रांची कसोटीत ‘अंपायर्स कॉल’मुळे भारतीय चाहते चांगलेच संतापले आहेत. वास्तविक, रांची कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे चार फलंदाज अंपायर्स कॉल’मुळे बाद झाले. हे पाहिल्यानंतर भारतीय चाहते सोशल मीडियावर अंपायर्सवर आपला राग काढत आहेत. खरे तर, चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ‘अंपायर्स कॉल’मुळे शुबमन गिल, रविचंद्रन अश्विन, रजत पाटीदार आणि आकाश दीप यांना एलबीडब्ल्यू बाद दिले. यानंतर रांची कसोटीतील अंपायरिंगवर चाहते अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अंपायर्स कॉल’चा टीम इंडियाला फटका –

टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ७ विकेट्स गमावल्या होत्या. त्यापैकी तीन फलंदाज ‘अंपायर्स कॉल’चे बळी पडले. त्याचवेळी तिसऱ्या दिवशी खालच्या फळीतील वेगवान गोलंदाज आकाशदीपही ‘अंपायर्स कॉल’च्या जाळ्यात अडकला. शुबमन गिल, रजत पाटीदार आणि आर अश्विन यांच्या यादीत सामील झाला. शुबमन गिलला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिले होते. त्यानंतर रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर त्याला ‘अंपायर्स कॉल’मुळे बाद घोषित करण्यात आले.

यानंतर आर अश्विन आणि रजत पाटीदारही ‘अंपायर्स कॉल’चा फटका बसला. त्याचवेळी तिसऱ्या दिवशी आकाश दीपलाही अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर रिप्लेमध्ये पाहून देखील ‘अंपायर्स कॉल’मुळे आकाश दीपला त्याची विकेट गमवावी लागली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा रॉड टकर आणि श्रीलंकेचा कुमार धर्मसेना मैदानावर पंच म्हणून काम पाहत आहेत.

हेही वाचा – SL vs AFG 3rd T20 : पंचांशी वाद घालणं पडलं महागात; श्रीलंकेच्या कर्णधारावर आयसीसीची मोठी कारवाई

इंग्लंड संघाला अंपायर्स कॉलचा झाला फायदा –

पंचांचे चुकीचे निर्णय केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही दिसून आले, त्यामुळे भारताने तिन्ही रिव्ह्यू लवकर गमावले. ‘अंपायर्स कॉल’चा इंग्लंडला फायदा झाल्याने त्याचा परिणाम टीम इंडियावर दिसून आला. टीम इंडिया गोलंदाजी करतानाही पंचाचे तीन चुकीचे निर्णय दिसले. ‘अंपायर्स कॉल’मुळे सलामीवीर बेन डकेट बचावला.

हेही वाचा – Babar Azam : प्रेक्षकांच्या ‘झिम्बाबर-झिम्बाबर’च्या घोषणांनी बाबर संतापला, बाटली फेकून मारण्याचा दिला इशारा, पाहा VIDEO

यानंतर पंचांनी ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांच्यावरही मेहरबानी केली. मात्र, टीम इंडियाला रिव्ह्यूद्वारे विकेट मिळाली. रिप्लेच्या वेळी अंपायर्स कॉल घेतला असता, तर रोहित आणि कंपनीचे मोठे नुकसान झाले असते. मात्र, टीम इंडियाला रिव्ह्यूद्वारे विकेट मिळाली. एवढेच नाही तर अंपायरने ऑली रॉबिन्सनलाही आऊट दिले नाही. त्यावेळी तो केवळ ८ धावांवर फलंदाजी करत होता. रॉबिन्सनने जो रूटला साथ दिली आणि ५८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडला ३५३ धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 4th test due to the umpires call india suffered and four batsmen lost their wickets vbm