India won the fiveTest series against England 4-1 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे पार पडला. या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन करताना इंग्लंडचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्याची मालिका ४-१ ने खिशात घातली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करत २५९ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १९५ धावांवर गारद झाला. १००वी कसोटी खेळणाऱ्या अश्विने सर्वाधिक ९ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज संपूर्ण इंग्लंड संघ दुसऱ्या सत्रात गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले.

भारतीय गोलंदाजांनी ‘बॅझबॉल’ची काढली हवा –

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ८४ धावांची चांगली खेळी केली. पण इंग्लंडचा टॉप ऑर्डर पुन्हा सपशेल अपयशी ठरली. सलामीवीर झॅक क्रॉऊली एकही धाव न काढता अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. बेन डकेट २ धावा करून बाहेर पतला. ऑली पोप १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, जॉनी बेअरस्टोने ३९ धावांची छोटी पण चांगली खेळी खेळली. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स २ धावा करून बाद झाला. त्यानंतर बेन फॉक्सला अश्विनने क्लीन बोल्ड केले. दुसऱ्या डावात भारतासाठी अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने ५ फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : शंभराव्या कसोटीत अश्विनची कमाल! कपिल देव यांना मागे टाकत केला खास पराक्रम

रोहित शर्मा आणि शुबमन गिलने झळकावली शतकं –

भारतीय संघाने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या. अशा प्रकारे भारताला २५९ धावांची मोठी आघाडी मिळाली. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकं झळकावली. रोहित शर्माने १०३ धावा केल्या. तर शुभमन गिलने ११० धावांचे योगदान दिले. याशिवाय देवदत्त पडिक्कल आणि सर्फराझ खान यांनी अर्धशतक केले. इंग्लंडकडून शोएब बशीर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शोएब बशीरने ५ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टलीने १-१ विकेट घेतली. बेन स्टोक्सने रोहित शर्माला बाद केले.