Dhruv Jurel and Kuldeep Yadav Smartly dismissing Ollie Pope : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झॅक क्रॉऊली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात करुन दिली आणि पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या. त्यानंतर कुलदीप यादवने ऑली पोपला यष्टिचित केले. पण पोपच्या या विकेटमध्ये कुलदीपपेक्षा यष्टिरक्षक ध्रुव जुरेलची भूमिका जास्त महत्त्वाची होती.
ध्रुव जुरेलने मिळवून दिली ऑली पोपची विकेट –
कुलदीप यादवने एमएस धोनीच्या कार्यकाळात पदार्पण केले होते. त्यावेळी विकेटच्या मागून माहीभाईची साथ मिळायची, असे तो अनेकदा म्हणायचा. धोनी निवृत्त झाल्यावर अचानक कुलदीपचा गोलंदाजीचा आलेख घसरला. मात्र, गेल्या एक-दोन वर्षांत त्याने पुनरागमन केले आहे. आता ज्याप्रकारे त्याने ध्रुव जुरेलच्या मदतीने ऑली पोपला यष्टीचित केले. त्यावरुन धोनीची आठवण करून दिली. ध्रुव जुरेल य्ष्टीच्या मागून धोनीप्रमाणे मार्गदर्शन करताना विकेट बॉलच्या अगदी आधी कुलदीपला म्हणाला, ‘हा पुढे येणार…’ यानंतर लगेच कुलदीपने गुगली चेंडू टाकला आणि जुरेलने पटकन बेल्स उडवल्या.
कुलदीप यादवने दोन्ही विकेट घेतल्या –
या डावात सुरुवातीला भारतीय संघाचे गोलंदाज विकेट्ससाठी तळमळलेले दिसले. यानंतर कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. बेन डकेटनंतर त्याने ऑली पोपचीही विकेट घेतली. विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते, अशी चर्चा होती. अशा स्थितीत कुलदीप यादवला सोडून तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याची चर्चा होती. पण असे झाले असते, तर मोठी चूक झाली असती हे कुलदीपने दाखवून दिले.
इंग्लंडला आठवा धक्का –
सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडला १८३ धावांवर आठवा धक्का बसला. या धावसंख्येवर इंग्लिश संघाने तीन विकेट गमावल्या आहेत. १७५ धावांवर जॉनी बेअरस्टो बाद झाला होता. यानंतर जो रुटही याच धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आता कर्णधार बेन स्टोक्सही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. कुलदीपचे हे पाचवे यश ठरले. कसोटीत चौथ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG 5th Test : शुबमन गिलने घेतला डकेटचा अप्रतिम झेल, आठवला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना
कुलदीप यादवने घेतल्या पाच विकेट्स –
इंग्लंडने १३६ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर इंग्लिश संघाने ३९ धावा करताना आणखी तीन विकेट गमावल्या आहेत. जडेजाने जो रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. त्याला २६ धावा करता आल्या. त्यानंतर १८३ धावसंख्येवर २ विकेट्स गमावल्या. याआधी कुलदीपने चार विकेट घेतल्या होत्या. त्याने झॅक क्रॉऊली (७९), बेन डकेट (२७), ऑली पोप (११) आणि जॉनी बेअरस्टो (२९) यांना बाद केले. सध्या शोएब बशीर आणि बेन फॉक्स क्रीजवर आहेत.