Rohit Sharma 12th Test Century : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आणखी एक शतक झळकावले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा नाबाद गेला आणि आज त्याने उपाहारापूर्वीच आपले शतक पूर्ण केले. हिटमॅन रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे १२वे शतक आहे. या शतकासह रोहितने बाबर आझमला डब्ल्यूटीसीच्या शतकाच्या बाबतीत मागे टाकले असून तो स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याचबरोबर ख्रिस गेलचाही विक्रम मोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डब्ल्यूटीसी स्पर्धेतील नववे शतक झळकावले –

डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ५२ सामन्यात १३ शतके झळकावली आहेत. दुसऱ्या स्थानावर मार्नस लॅबुशेन आहे, ज्याने ११ शतके झळकावली आहेत. यानंतर केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर १० शतके आहेत. तर स्टीव्ह स्मिथ ९ शतके झळकावण्यात यशस्वी ठरला आहे. आता रोहित शर्माने त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. स्टीव्ह स्मिथने ४५ सामन्यांमध्ये ९ शतके ठोकली आहेत, तर रोहितने केवळ ३२ सामन्यांमध्ये ९ शतके ठोकली आहेत. पाकिस्तानच्या बाबर आझमने २९ सामन्यांमध्ये ८ शतके ठोकली असून तो आता रोहितच्या मागे पडला आहे.

रोहित शर्माने ख्रिस गेलला मागे टाकले –

सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून ४२ शतके केली आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर आता ४३ शतके आहेत. आता रोहितच्या पुढे फक्त दोनच फलंदाज उरले आहेत. डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ४९ शतके झळकावली आहेत, तो पहिल्या क्रमांकावर आहे, तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ४५ शतके केली आहेत.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरची शंभरवी कसोटी खेळणाऱ्या विल्यमसन-साऊदीसाठी खास पोस्ट; म्हणाला, “ते न्यूझीलंड क्रिकेटचे…”

राहुल द्रविडच्या विक्रमाशी साधली बरोबरी –

रोहित शर्मा आता सर्वाधिक शतके करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत, त्याने आपल्या कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे, त्याच्या नावावर आतापर्यंत ८० शतके आहेत. रोहित शर्माने त्याचा प्रशिक्षक आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी साधली. राहुल द्रविडनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतके झळकावली आहेत, आता रोहितनेही तेवढीच शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IND vs ENG : १००वा कसोटी खेळणाऱ्या अश्विनसाठी कुलदीप यादवनं दाखवलं मोठं मन, बीसीसीआयने शेअर केला VIDEO

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय सलामीवीर –

भारतीय सलामीवीर म्हणून इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी ४ शतके झळकावली आहेत, आता रोहित शर्मानेही तेवढीच शतके म्हणजे ४ शतके झळकावली आहेत. यापैकी रोहितने या मालिकेत २ शतके झळकावली आहेत. या शतकासह रोहितने विजय मर्चंट, मुरली विजय आणि केएल राहुल यांना मागे टाकले आहे. या सर्व ३ फलंदाजांच्या नावावर ३ शतके आहेत.