IND vs ENG T20I Series Aakash Chopra statement on Abhishek Sharma : यजमान भारतासाठी ही निश्चितच बदलाची वेळ आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय भारतीय संघ टी-२० फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. अभिषेक शर्मा शॉर्टलिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या काही खेळाडूंपैकी एक आहे, परंतु राष्ट्रीय संघासह त्याच्या छोट्या कार्यकाळात तो सातत्य राखू शकला नाही. पॉवर हिटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिषेक शर्माने धमाकेदार शतक झळकावले होते, पण त्यानंतर अनेक सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. आता त्याच्याबद्दल आकाश चोप्राने मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४७ चेंडूत स्फोटक शतक झळकावले. भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने शर्माची क्षमता मान्य केली आहे, परंतु त्याला संघात आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर त्याला बुधवारपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. आकाश चोप्रा म्हणाला, ‘अभिषेकचा फॉर्म थोडा वर-खाली झाला आहे. पदार्पणात, त्याच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले. त्यानंतर तो त्या रूपात दिसला नाही.’

अभिषेक शर्मासाठी ही शेवटची संधी –

माजी खेळाडू पुढे म्हणाला, “मला वाटते की अभिषेक शर्मासाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे त्याने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाटी फायदेशीर ठरले. पण हे ५ सामने आहेत, मी त्याला म्हणेन की त्याने पुढे जाऊन आपल्या पद्धतीने खेळावे. जसे संजूने गेल्या ३ सामन्यात नाव कमावले आहे. तसेच अभिषेक शर्मालाही हे काम करावे लागणार आहे. अन्यथा वेळेत थोडा बदल होऊन जैस्वाल संघात परतेल.”

हेही वाचा – Champions Trophy 2025 : “युझवेंद्र चहलची फाईल बंद केली आहे…”, माजी खेळाडूचा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर आरोप

अभिषेक शर्माची कामगिरी –

अभिषेक शर्माने १२ टी-२० सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून झिम्बाब्वेविरुद्धचे शतक वगळता त्याने ११ सामन्यांमध्ये १५६ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १७१.८१ असला तरी त्याची सरासरी २३.२७ ही निश्चितच चिंतेची बाब आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला बळ देईल. शमी भारताकडून अखेरचा सामना एकदिवसीय विश्वचषक फायनल नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा – Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार की नाही? ICC ने स्पष्टच सांगितलं

‘बॅट विरुद्ध बॅट’ –

आकाश चोप्रा यांनी या मालिकेला ‘बॅट विरुद्ध बॅट’ असे म्हटले आहे. त्याच्या मते, ही बॅट विरुद्ध बॅट स्पर्धा होणार आहे, कारण फलंदाजी दोन्ही बाजूंनी भारी आहे. संघर्ष पाहिला तर तो हलका संघर्ष नाही. ही एक जोरदार फटकेबाजीची मालिका होणाप आहे, ज्यामध्ये तुम्ही एक षटकार मारला तर दुसरा संघ दोन षटकार मारु शकतो. पहिल्या सामन्यातूनच गती सेट केली जाऊ शकते आणि इतर संघ देखील त्याच दृष्टीकोनातून त्याकडे पाहतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng aakash chopra warns abhishek sharma of last chance against england t20is series vbm