IND vs ENG Abhishek Sharma breaks Yuvraj Singh record : अभिषेक शर्माने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. अभिषेकच्या या झंझावातापूर्वी भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्यकुमार यादवचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आणि पाहुण्यांना १३२ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात भारताने ४३ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करत युवराज सिंगचा मोठा विक्रम मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा मोठा विक्रम –

अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करताना ७९ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना त्याने ५ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीच्या जोरावर अभिषेकने त्याचा गुरु युवराज सिंगचा एक खास विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरुद्ध टी-२० डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. कोलकात्यात अभिषेकने ८ षटकार ठोकले. तर युवराजने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ षटकार मारले होते. सूर्याने पण २०२२ मध्ये ६ षटकार मारले आहेत.

अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले. या फॉरमॅटमध्ये भारतीयाने केलेली दुसरी सर्वात वेगवान खेळी आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. त्याने १२ चेंडूत हा पराक्रम केला होता. अभिषेकच्या ब्लॉकबस्टर शोपूर्वी, सॅमसनचे तुफानही पाहायला मिळाले, जेव्हा त्याने गस ऍटकिन्सनच्या एका षटकात चार चौकार आणि एका षटकारासह एकूण २२ धावा केल्या. मात्र, त्याला या खेळीचे मोठ्या धावांमध्ये रूपांतर करता आले नाही.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : “युझवेंद्र चहलची फाईल बंद केली आहे…”, माजी खेळाडूचा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर आरोप

अर्शदीप सिंगने घडवला इतिहास –

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात इतिहास घडवला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९७ विकेट्स घेणारा भारताचा गोलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने ९६ विकेट्स घेणाऱ्या युझवेंद्र चहलला मागे टाकले. अर्शदीपने २०२२ मध्ये त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि चहलच्या ८० टी-२० सामन्यांपेक्षा १९ सामने कमी असलेल्या त्याच्या ६१व्या सामन्यात हा पराक्रम केला. २५ वर्षीय अर्शदीपने या फॉरमॅटमध्ये ८.३२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng abhishek sharma breaks yuvraj singh record for most sixes in a t20 innings against england vbm