IND vs ENG Abhishek Sharma equals Yuvraj Singh record : भारतीय संघाचा २४ वर्षीय युवा डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला इंग्लंडकडून १३३ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे अभिषेक शर्माच्या ३४ चेंडूत ७९ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या १२.५ षटकांत पूर्ण केले. या सामन्यात अभिषेकने वादळी अर्धशतक झळकावत युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी अगदी डावाच्या सुरुवातीपासूनच दिसून आली. ज्यामध्ये त्याने कोणत्याही इंग्लिश गोलंदाजावर दयामाया दाखवली नाही. अभिषेक शर्माने ७९ धावांच्या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ८ षटकारही मारले. अभिषेकने आपल्या डावात २३२.३५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यासह आता घरच्या मैदानावर भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा युवराज सिंगसह तो तिसरा खेळाडू ठरला आहे. या खेळीदरम्यान अभिषेकने अवघ्या २० चेंडूत ५० धावांचा टप्पा गाठला होता.

भारतासाठी मायदेशात सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकणारे खेळाडू :

सूर्यकुमार यादव – १८ चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका (गुवाहाटी, वर्ष २०२२)
गौतम गंभीर – १९ चेंडू विरुद्ध श्रीलंका (नागपूर, २००९)
अभिषेक शर्मा – २० चेंडू विरुद्ध इंग्लंड (कोलकाता, वर्ष २०२५)
युवराज सिंग – २० चेंडू विरुद्ध श्रीलंका (मोहाली, २००९)

हेही वाचा – IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा खास विक्रम, कोलकात्यात साकारली स्फोटक खेळी

भारताने पाकिस्तानच्या विक्रमाची केली बरोबरी –

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना ७ गडी राखून जिंकला, तर कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवरील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा त्यांचा सलग ७ वा विजय आहे. पूर्ण सदस्य संघ म्हणून भारतीय संघाने या बाबतीत पाकिस्तानच्या एका विशेष विक्रमाची बरोबरी केली आहे. इंग्लंड संघाने २०१० ते २१ पर्यंत कार्डिफच्या मैदानावर सलग ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. तर पाकिस्तान संघाने कराचीच्या मैदानावर २००८ ते २०२१ पर्यंत ७ सामने जिंकले होते.

हेही वाचा – IND vs ENG 1st T20 Highlights : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ७ विकेट्सनी चारली धूळ, मालिकेत १-० ने घेतली आघाडी

टी-२० मध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक सलग विजय (पूर्ण सदस्य संघ) –

८ इंग्लंड – कार्डिफ (२०१०-२१)
७ पाकिस्तान – कराची (२००८-२१)
७ भारत – कोलकाता (२०१६-२५) *