Akash Deep’s brilliant Test debut against England : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणारा भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपला लवकरच आनंदाची बातमी मिळाली आहे. नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यानंतर आपले पाचवे आणि संघाचे दहावे षटक टाकताना एका षटकात आकाश दीपने दोन विकेट्स घेतल्या. त्याने बेन डकेटला ऑली पोपला बाद करत शानदार पदार्पण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाशने एका षटकात घेतल्या दोन विकेट –

झॅक क्रॉलीची विकेट हुकल्यानंतर आकाश दीपने इंग्लिश डावातील दहाव्या आणि आपल्या पाचव्या षटकात दोन बळी घेतले. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेन डकेटला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. तो ११ धावा करुन तंबूत परतला. यानंतर आकाशने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. त्यानंतर फलंदाजीला आलेला ओली पोप षटकाच्या चौथ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. अशा प्रकारे आकाशने जबरदस्त स्टाइलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

आकाशने घेतल्या तीन विकेट्स –

ऑली पोपला खातेही उघडता आले नाही. यानंतर पाचव्या चेंडूवर जो रूटविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपीलही करण्यात आली. मात्र, हा चेंडू इम्पॅक्ट आउटसाइट असल्याने रुट थोडक्यात बचावला. यानंतर आकाशने इंग्लंडच्या डावाच्या १२व्या षटकात बदला घेत झॅक क्रॉलीला बाद केला. त्याने क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. तत्पूर्वी आकाशने त्याच्या दुसऱ्या षटकांत क्रॉलीला क्लीन बोल्ड केले होते, पण तो नो बॉल होता. आता त्याने पुन्हा क्लीन बोल्ड केले. त्याने शानदार शैलीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तीन गडी गमावून इंग्लंडची धावसंख्या सध्या ५७ धावा आहे. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो क्रीजवर आहेत. इंग्लंडने पहिल्या तासातच तीन विकेट गमावल्या आहेत.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : कोण आहे आकाश दीप? ज्याने रांची कसोटीत भारतासाठी केले पदार्पण

आकाश दीपने दुसऱ्यांदा झॅक क्रॉऊलीला क्लीन बोल्ड केले –

चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आकाश दीपने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉऊलीला क्लीन बोल्ड केले होते. त्याचा चमकदार इन स्विंग चेंडू आतल्या बाजूने आला आणि थोडा खाली राहिला. क्रॉऊली तो खेळण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आणि चेंडूने ऑफ स्टंप उखडला. यानंतर आकाश दीपने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा आनंदा साजरा करायला सुरुवात केली होती, तितक्यात मैदानावर सायरन वाजला आणि त्याच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. अंपायरने आकाश दीपचा हा चेंडू नो बॉल दिला. त्याने चेंडू टाकताना रेषा ओलांडली होती. अशा प्रकारे झॅक क्रॉऊलीला ४ धावांवर पहिल्यांदा जीवदान मिळाले होते. परंतु या जीवदानाचा क्रॉऊलीला फायदा उचलता आला नाही आणि ४२ धावा काढून बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng akash deep who made his test debut brilliantly to dismiss ben duckett and ollie pope in the same over vbm