India vs England, World Cup 2023: भारतीय संघ रविवारी (२९ ऑक्टोबर) विश्वचषकातील त्यांच्या सहाव्या सामन्यात इंग्लंडशी दोन हात करणार आहे. लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा आपली विजयी मोहीम सुरू ठेवण्याचा मानस असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-११ मध्ये बदल करू शकतो, असे मानले जात आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला लखनऊमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने तो न्यूझीलंड विरुद्धचा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यानंतर २ नोव्हेंबरला मुंबईत भारताचा श्रीलंकेशी सामना होईल. त्याच वेळी, ५ नोव्हेंबरला टीम इंडिया कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडशिवाय पांड्या या दोन सामन्यांतही कदाचित खेळू शकणार नाही.

IND vs ENG ECB Tom Banton called up as cover of injured Jacob Bethell for the 3rd ODI against India
IND vs ENG : दुसऱ्या सामन्यादरम्यान इंग्लंडने घेतला मोठा निर्णय! स्फोटक खेळाडूचे संघात पुनरागमन, नेमकं कारण काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
IND vs ENG Stampede scenes during 2nd ODI ticket sale in Cuttack few fans fall unconscious
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान कटकमध्ये चेंगराचेंगरी, काही जण झाले बेशुद्ध; VIDEO व्हायरल
Black market for tickets started three days before cricket match
क्रिकेट सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच तिकिटांचा काळाबाजार…
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट
Jos Buttler Statement on Harshit Rana Concussion Substitute Controversy IND vs ENG
IND vs ENG: “आम्ही सामना जिंकणं अपेक्षित…”, जोस बटलरचं हर्षित राणाच्या खेळण्याबाबत मोठं वक्तव्य, सामन्यानंतर राणा-दुबेबाबत पाहा काय म्हणाला?
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती

१९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक चेंडू अडवताना घसरला आणि त्याचा पाय मुरगळला, त्यामुळे तो २२ ऑक्टोबरला धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला मुकला. त्याने दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सोमवारी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पोहचला होता.

लखनऊमधील तीन सामन्यांमध्ये गोलंदाजांची कामगिरी

लखनऊमध्ये हा विश्वचषकातील चौथा सामना असेल. आतापर्यंत येथे तीन सामने खेळले गेले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ तीनपैकी दोन सामने जिंकला आहे. आतापर्यंत ४७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी २६ विकेट्स या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्याचबरोबर १५ विकेट्स या फिरकी गोलंदाजांनीही घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे मानले जात आहे. अश्विनला इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरवून भारतीय संघ नवी रणनीती अवलंबण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा: ENG vs SL: इंग्लंड-श्रीलंकासाठी आज ‘करो या मरो’! जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? जाणून घ्या

सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग-११मध्ये स्थान मिळाले. शमीने स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी करत पाच विकेट्स घेतल्या. लखनऊची खेळपट्टी संथ गोलंदाजांना मदत करेल आणि अशा परिस्थितीत अश्विनला या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळू शकते. असे झाल्यास अश्विन आठव्या क्रमांकावर खेळणार असल्याने फलंदाजीही मजबूत होईल. अश्विनने पुनरागमन केल्यास शमी किंवा सिराज यापैकी एकाला संघातून बाहेर बसावे लागेल. सिराज सतत सामने खेळत आहे त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

हेही वाचा: ENG vs SL: बेन स्टोक्स दम्याशी झुंजत आहे? इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सराव करताना इनहेलर वापरतानाचा फोटो व्हायरल

इंग्लंडविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-११

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

Story img Loader