भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शानदार शतक झळकावलं. राहुल हा १२७ धावांवर खेळत असून हे त्याच्या कारकीर्दीमधील सहावे शतक आहे. राहुलला रोहित शर्माने ८३ धावा करत चांगली साथ दिल्याने इंग्लंविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला भारताने दमदार सुरुवात केलीय. पहिल्या दिवसअखेर भारताने ९० षटकांत ३ बाद २७६ धावापर्यंत दमदार मजल मारली असून राहुलच्या साथीला उपकर्णधार अजिंक्य रहाणे एका धावेवर खेळत आहे. भारताला या मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केलेत. कोणते आहेत हे विक्रम पाहूयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) राहुलने त्याच्या कारकिर्दीमधील सहावे शतक झळकावले. सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये तो २४ व्या स्थानी आहे. त्याने या शतकासहीत एम. एस. धोनी आणि मंसूर अली खान पतौडी यांच्या विक्रमाची बरोबरी केलीय. या दोघांनीही कसोटीमध्ये प्रत्येकी सहा शतकं झळकावली आहेत.

२) राहुलने सलामीवीर म्हणून मैदानात उतरताना रोहित शर्मासोबत १२६ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर तिसऱ्या विकेट्ससाठी त्याने विराट कोहलीच्या सोबतीने ११७ धावा जोडल्या. कोणत्याही भारतीय खेळाडूने दोन शतकी भागीदाऱ्या करण्याची ही लॉर्ड्सवरील पहिलीच वेळ ठरली.

३) सलामीवीर म्हणून राहुलचे हे परदेशातील चौथे शतक आहे. आशियाबाहेरील देशांमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय सलामीवीर म्हणून के. एल. राहुल दुसऱ्या स्थानी आहे. केवळ सुनील गावस्कर यांनीच सलामीवीर म्हणून राहुलपेक्षा अधिक शतकं झळकावली आहेत. गावस्कर यांनी सलामीला फलंदाजी करताना १५ शतकं केली आहेत. कालच्या शतकासहीत राहुलने सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्मासोबत स्थान मिळवलं आहे.

४) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकवणारा के. एल. राहुल हा १० वा फलंदाज ठरलाय. दिलीप वेगसरकरांनी या मैदानावर सर्वाधिक म्हणजेच तीन शतक झळकावून येथे सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय ठरले आहेत. सौरभ गांगुली, राहुल द्रविड, अजहरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकरनेही या मैदानात शतक झळकावलं आहे.

५) या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणारा राहुल हा तिसरा सलामीवीर आहे. या आधी वीनू मांकड आणि रवि शास्त्रींनी हा विक्रम केलाय. आता लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू हा विक्रम बनवण्याची राहुलकडे संधी आहे. सध्या का विक्रम वीनू मांकड यांच्या नावे असून त्यांनी १८४ धावा केल्यात.

६) राहुलने आपल्या या शतकी खेळीमध्ये पहिला चौकार १०८ व्या चेंडूवर लगावला. त्याने आधीच्या १०७ चेडूंमध्ये केवळ २२ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोईन अलीच्या चेंडूवर षटकार लगावत सामन्यात पहिल्यांदाच चेंडू सीमेपार धाडला.

तब्बल ३५ वर्षांनी प्रथमच भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेरील कसोटी सामन्यात प्रत्येकी ७५ धावांहून अधिक धावा केल्या. यापूर्वी १९८६मध्ये सुनील गावस्कर (१७२) आणि कृष्णमाचारी श्रीकांत (११६) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.