भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आज (९ जुलै) बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून रीचर्ड ग्लीसन या गोलंदाजाने पदार्पण केले. या नवख्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाजांचे बळी मिळवून ‘ड्रीम डेब्यू’ केला. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला वेगवान सुरुवात मिळवून दिली. मात्र, पाचव्या षटकाच्या चेंडूवर रिचर्ड ग्लीसनच्या गोलंदाजीवर जोस बटलरने रोहितचा झेल टिपला. तो २० चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. ग्लीसनच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील तो पहिला बळी ठरला.

कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहलीकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करत असलेल्या कोहलीने या सामन्यात देखील निराशा केली. रिचर्ड ग्लीसनने विराटला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. हा ग्लीसनसाठी दुसरा बळी ठरला. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने ऋषभ पंतलाही बाद केले.

हेही वाचा – SL vs AUS Test Series: आता तर स्मिथनेही ठोकले शतक; विराट कोहली मात्र अजूनही प्रतिक्षेतच

विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याविराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याच्या संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या दीपक हुडा आणि ईशान किशनला वगळून विराट कोहलीला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.