बर्मिंगहॅममध्ये एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडदरम्यान निर्णाय कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावरती रांगेत उभे राहून ४५ सेंकद टाळ्या वाजवल्या. इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांच्या स्मरणार्थ सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंग्लंडमध्ये आज (२ जुलै) बॉब विलिसचा दिवस साजरा केला जात आहे. पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि अशा रुग्णांच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रोस्टेट कॅन्सर हा फक्त पुरुषांमध्ये आढळणार प्रकार आहे. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीतील पेशींची अनियंत्रित वाढ होते तेव्हा प्रोस्टेट कॅन्सर सुरू होतो. बॉब प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण होते. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आपल्या उतारवयात त्यांनी प्रोस्टेट कॅन्सरसाठी जागृती मोहिम हाती घेतली होती.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : ‘हा युवराज आहे की बुमराह?’, ब्रॉडची धुलाई केल्याने सचिन तेंडुलकरला पडला प्रश्न

बॉब विलिस हे इंग्लंड क्रिकेटमधील अतिशय प्रसिद्ध खेळाडू होते. १९८१च्या अॅशेस विजयासाठी त्यांना ओळखले जाते. विलिस हे त्या विजयाचे प्रमुख शिल्पकार होते. चौथ्या डावात त्यांनी घेतलेल्या आठ बळींमुळे इंग्लंडला अतिशय कमी धावसंख्येचा बचाव करता आला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विलिसने समालोचनाकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यांनी खेळाडू आणि आधुनिक क्रिकेटवर कठोर टीका करण्यात नावलौकिक मिळवला होता.