IND vs ENG Test Series, Ravichandran Ashwin: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडचा संघ घाबरलेला दिसत आहे. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज बेन डकेटने मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे कौतुक केले. त्याने अश्विनचे जागतिक दर्जाचे गोलंदाज म्हणून वर्णन केले आणि आगामी मालिकेत त्याला बाद केल्यास आश्चर्य वाटणार नाही असे सांगितले. भारतीय चाहत्यांनी याला माइंड गेम खेळत असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर. अश्विन हा आशियाई खेळपट्ट्यांवर भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या १९ कसोटींमध्ये ८८ विकेट्स घेतल्या आहेत, त्यापैकी ७४ भारतीय भूमीवर आल्या आहेत. डकेटने भारतात दोन सामने खेळले असून तिन्ही डावात त्याने फलंदाजी केली आहे. प्रत्येक वेळी अश्विनने त्याला बाद केले असून अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. मात्र, त्या मालिकेनंतर बेन डकेटने त्याच्या फलंदाजी तंत्रात खूप चांगला बदल केला आणि आता तो इंग्लंड संघातील प्रमुख फलंदाज बनला आहे.

हेही वाचा: BCCI new Selectors: अजित आगरकरला निवड समितीत मिळणार नवा जोडीदार! सिलेक्टर पदासाठी मागवले अर्ज

बेन डकेट म्हणाला की, तो आगामी आव्हानांसाठी तयार आहे आणि यावेळी त्याने अश्विनचे भरभरून कौतुक केले. डकेट म्हणाला की, “अश्विनविरुद्ध संघर्ष करणारा तो पहिला डावखुरा फलंदाज नाही.” तो पुढे म्हणाला, “मी त्या मालिकेनंतर खूप क्रिकेट खेळलो आहे आणि त्या वर्षांतील अनुभव मला परिपक्व बनवून गेला आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. यावेळी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारत माझ्याबाबत ज्या काही योजना करेल त्या माझ्यासाठी नवीन नसतील. मी भारतीय संघ कोणत्या योजना आखतो हे पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशा प्रकारच्या फिरकी खेळपट्ट्यांवर खेळण्याची मला सवय झाली आहे. भारतात चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे. तिथून बाहेर गेल्यावर काय अपेक्षा ठेवायची हे मला चांगलंच माहीत आहे. अशा परिस्थितीत अश्विनविरुद्ध संघर्ष करणारा मी शेवटचा डावखुरा खेळाडू नव्हतो. त्याने इतर देशातील संघांना देखील अडचणीत आणले आहे.”

अश्विन हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे: डकेट

यावेळीही अश्विन डकेटला बाद करेल याची त्याला खात्री असल्याचे इंग्लंडच्या सलामीवीराने सांगितले, परंतु भारतीय परिस्थितीत तो स्वत:च्या फलंदाजीवर विश्वास ठेवेल. फिरकी खेळपट्ट्या टीम इंडिया देईल यात आश्चर्य वाटणार नाही, असा दावा त्याने केला. तो म्हणाला, “मला खात्री आहे की अश्विन पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये पाठवेल, तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पण मी आता चांगल्या खेळपट्टीवर किंवा सपाट खेळपट्टीवर जसे खेळतो तसेच इथे देखील खेळेन जेणेकरून मला आक्रमक शॉट्स खेळावे लागतील असे वाटणार नाही. प्रत्येक चेंडूवर स्वीप करणार नाही.”

हेही वाचा: Prakhar Chaturvedi: कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने रचला मोठा इतिहास! कूचबिहार ट्रॉफीमध्ये ठोकल्या ४०० धावा

“त्या खेळपट्ट्या अधिक फिरकी घेणाऱ्या असतील आणि गेल्या १८ महिन्यांत हा संघ ज्या प्रकारे खेळला आहे, तसेच आम्ही खेळू. मला माहित आहे की माझी ताकद काय आहे आणि मी नक्कीच उत्तम प्रदर्शन करेन. भारतीय चाहते माझ्या खेळीने आश्चर्यचकित होणार अशी कामगिरी करेन,” डकेट म्हणाला. यातून इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेयाधी माइंड गेम खेळत आहे, हे दिसून येते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स फायनलच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्वाची आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng englands ben duckett panics before test series begins says ashwin will get me out again avw