Rohit Sharma Troll by Fans after IND vs ENG 1st ODI : भारताने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ४ विकेट्सनी पराभव केला. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा चाहत्यांची निराश केली. कारण अवघ्या दोन धावांवर झेलबाद. विशेष म्हणजे कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच दिवसापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरी, नंतर रणजी ट्रॉफीमध्ये स्वस्तात बाद होणे आणि आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मावर खूप दबाव आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या ५ डावांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ ३१ धावा झाल्या होत्या. परिस्थिती अशी होती की दबावाखाली त्याने सिडनी कसोटीतूनही स्वतःला वगळले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या खराब कामगिरीमुळे चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. रोहित शर्माने आता निवृत्त व्हावे, असे मोठ्या संख्येने चाहते म्हणत आहेत. पहिल्या वनडे सामन्यात साकिब महमूदने त्याला लियाम लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद केले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात केली. प्रथम जैस्वालची विकेट पडली, ज्यासा १५ च्या धावसंख्येवर जोफ्रा आर्चरने बाद केले. १९ धावांवर भारताने पहिली विकेट गमावली. जैस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडियाने धावफलकावर एकही धाव जोडली नव्हती, त्यानंतर रोहितही २ धावांवर तंबूत परतला. यानंत रोहित शर्माला खूप ट्रोल केले जात आहे.

चाहत्यांनी रोहित शर्माला केले ट्रोल –

रोहित शर्माला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्ती घ्यावी आणि तो फिटनेसकडे लक्ष देत नाही, असे एका चाहत्याने लिहिले.

आणखी एका चाहत्याने कर्णधाराला खिल्ली उडवताना लिहिले की, रोहितची शैली चांगली आहे की तो लवकर आऊट होतो आणि इतर फलंदाजांना फलंदाजीची संधी देतो. रोहितला बाहेर फेकण्यापूर्वी त्याने निवृत्ती घ्यावी. रोहित आता भारतीय संघावर ओझे बनत चालला आहे, असेही एका व्यक्तीने म्हटले आहे.

Story img Loader