नव्याने उभारण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळपट्टीने आपली कमाल दाखवत भारत आणि इंग्लंडमधला तिसरा कसोटी सामना अवघ्या २ दिवसांत संपवला. या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. मात्र, आता चौथ्या कसोटी सामन्यामध्ये देखील तोच कित्ता गिरवला जातोय की काय, असं वाटू लागलं असतानाच रिषभ पंत टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. अवघ्या ११७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकत रिषभ पंतनं भारताच्या डावाला आकार दिला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर देखील रिषभ पंतनं एका बाजूने तंबू ठोकून धावा जमवायला सुरुवात केली. धिम्या गतीने खेळत अर्धशकत पूर्ण करणाऱ्या रिषभ पंतनं पुढच्या ५० धावा वेगाने पूर्ण केल्या. मात्र, अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रिषभ पंत झेलबाद झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा