IND vs ENG Gautam Gambhir Master stroke Harshit Rana Debut : भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६६ धावा करून ऑलआऊट झाला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत निराशाजनक सुरुवात झाली, मात्र डगआऊटमध्ये बसलेल्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने असा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळाला की, ज्याने अल्पावधितच संपूर्ण सामन्यालाच कलाटणी दिली आणि भारताने बाजी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गंभीरने कोणता मास्टर स्ट्रोक खेळला?

वास्तविक, टीम इंडियाकडून फलंदाजी करताना शिवम दुबेच्या डोक्याला दुखापत झाली. शिवम दुबेची दुखापत खूप गंभीर होती, त्यामुळे तो क्षेत्ररक्षणाच्या वेळी मैदानावर येऊ शकला नाही. अशा स्थितीत, कनक्शनच्या नियमांनुसार, टीम इंडिया शिवम दुबेच्या जागी आणखी एखाद्या खेळाडूला मैदानात उतरवू शकते. इथेच गौतम गंभीरने आपला मास्टर स्ट्रोक खेळत हर्षित राणाला मैदानात उतरवले.

गौतम गंभीरने सीमारेषेवरुन दिले गुरुमंत्र –

हर्षित राणाला याआधी टीम इंडियाकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अशा प्रकारे हा हर्षित राणाचा पदार्पणाचा सामना ठरला. हर्षितने या सामन्यात तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आपले टी-२० पदार्पण संस्मरणीय केले. हर्षित राणाच्या या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात मजबूत पकड निर्माण केली. यानंतरही गौतम गंभीर सीमारेषेवर उभा राहून आपल्या खेळाडूंना सतत मार्गदर्शन करत होता. तो सीमारेषेवर हार्दिक पंड्याला मार्गदर्शन करतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे. विशेष म्हणजे भारताने अखेरच्या षटकात इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला.

हर्षित राणाचं दमदार पदार्पण –

तथापि, हर्षित हा पूर्ण वेगवान गोलंदाज आहे, तर शिवम दुबे, जो दुखावल्यामुळे बाजूला झाला होता, तो एक अष्टपैलू फलंदाज होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे त्याच्या जागी रमणदीप सिंगचा पर्याय होता, पण गौतम गंभीरने हर्षित राणाला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला जो पूर्णपणे योग्य ठरला. हर्षितने सामन्यात ४ षटकात ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng gautam gambhir played a master stroke as harshit rana to beat england pune t20i match vbm