IND vs ENG T20I Most balls bowled for India in T20I : इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा २६ धावांनी पराभव केला. इंग्लंडने भारताला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ १४५ धावा करता आल्या. या विजयासह इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केले आहे. तरीही भारत २-१ ने आघाडीवर आहे. इंग्लंडसाठी बेन डकेटने अर्धशतक झळकावले तर भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात हार्दिक पंड्याने एक खास पराक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक पंड्याने केला मोठा पराक्रम –

अष्टपैलू हार्दिक पंड्याने मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. त्याने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलला मागे टाकले आहे. हार्दिक आता टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने या प्रकरणात युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. हार्दिकने टी-२० मध्ये भारतासाठी आतापर्यंत १७९९ चेंडू टाकले आहेत, तर भुवनेश्वर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत १७९१ चेंडू टाकले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक चेंडू टाकणारे गोलंदाज :

१७९९* – हार्दिक पंड्या
१७९१ – भुवनेश्वर कुमार
१७६४ – युझवेंद्र चहल
१५०९ – जसप्रीत बुमराह
१४५२ – रविचंद्रन अश्विन</p>

हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी –

भारतासाठी हार्दिक पंड्याने सर्वांधिक ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने २ षटकार आणि १ चौकार लगावला. तत्त्पूर्वी त्याने गोलंदाजी करताना २ विकेट्सही घेतल्या होत्या. अभिषेक शर्माने १४ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २४ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने १५ धावा जोडल्या. त्याने २ चौकार मारले. मोहम्मद शनीने एका षटकाराच्या मदतीने ७ धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केल्याने भारताला २६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता मालिकेतील तिसरा शुक्रवारी (३१ जानेवारी) पुण्यात पुन्हा होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng hardik pandya surpasses bhuvneshwar kumar to become most balls bowled for india in t20i cricket vbm