IND vs ENG 2nd T20I Updates in Marathi: भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने भारताला विजयसाठी १६६ धावांचे लक्ष्य दिले आहे. मोठी भागीदारी रचता आली नसली तरी इंग्लंडच्या फलंदाजांनी चौकार षटकारांमध्ये गोलंदाजीला उत्तर दिली. भारताच्या गोलंदाजांनीही आपली उत्कृष्ट गोलंदाजी केली. इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक सध्या चर्चेत आहे, कारण दुसऱ्या टी-२० सामन्यातही वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अपयशी ठरलेल्या ब्रूकने धुकं असल्याने नीट खेळता आल्याचे म्हणाला होता, पण आता दुसऱ्या टी-२० सामन्यातही सर्वकाही स्पष्ट दिसत असतानाही तो अपयशी ठरला आणि पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीच्या फिरकीचा बळी ठरला.

Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
India Beat England by 2 Wickets Tilak Varma Fifty Ravi Bishnoi Washington Sundar
IND vs ENG: भारताचा विजयी ‘तिलक’, नाट्यमय लढतीत इंग्लंडवर केली मात; बिश्नोईची साथ ठरली निर्णायक
Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…

चेन्नईतील दुसऱ्या टी-२० सामन्यातही इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. यावेळी सर्वांच्या नजरा या सामन्यापूर्वी आपल्या वक्तव्याने सर्वांना चकित करणाऱ्या हॅरी ब्रूकवर खिळल्या होत्या. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात या उजव्या हाताच्या फलंदाजाला भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याच्या फिरकीने चकमा देत क्लीन बोल्ड केले होते. यानंतर ब्रूकने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोलकात्यात जास्त धुकं असल्यामुळे तो वरुणचा चेंडू नीट पाहू शकत नव्हता.

हॅरी ब्रूक दुसऱ्या सामन्यात वरूणच्या गोलंदाजीवर कसा खेळणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. पण झालं तेच जे पहिल्या टी-२० सामन्यात घडलं होतं. इंग्लंडने झटपट विकेट गमावल्याने त्याला लवकर फलंदाजीला यावं लागलं, क्रीझवर येताच त्याने झटपट एक चौकार आणि एक षटकार ठोकला. असे वाटत होते की ब्रूकने कोलकात्यात म्हटल्याप्रमाणे नीट खेळत होता. पण पुन्हा एकदा वरुणने त्याला आपल्या गुगलीत अडकवून क्लीन बोल्ड केले. ब्रूक स्टंप विखुरलेले पाहून आश्चर्यचकित होऊन हसला आणि पुन्हा माघारी परतला.

हॅरी ब्रूक बाद होताच सुनील गावस्करांनी समालोचन करताना त्याची चांगलीच फिरकी घेतली. गावस्कर म्हणाले, “पुन्हा एकदा वरूण चक्रवर्ती. धुक्याची गरज नाहीय. चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला आहे. आता तर लाईट नीट आहे. चेन्नईमध्ये धुकं नाहीय प्रकाश व्यवस्थित आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये थोडं धुकं होतं, इथे धुकं नाहीय, ऑफ-स्टंपच्या वरच्या बाजूला चेंडू नेमका कुठे जातोय, हेच त्याला कळलं नाही. हॅरी ब्रूक १३ धावांवर बाद, ३ बाद ५९ धावा आणि हो, मला वाटतं वरुण चक्रवर्ती त्याच्याकडे बघून कदाचित विचारत असेल, बघ, इथे धुकं आहे का?”

अनेक संघांविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आपल्या फलंदाजीने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या ब्रूकला अद्याप भारतात यश मिळालेले नाही. आयपीएलचे २ हंगाम खेळूनही तो फ्लॉप राहिला, तर भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषकातही तो अपयशी ठरला.

Story img Loader