IND vs ENG 1st ODI Harshit Rana Debut : नागपुरात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला वनडे सामना इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. इंग्लंडने पहिल्या ८ षटकांत नाणेफेक जिंकण्याचा फायदा घेतला. यामध्ये इंग्लंडच्या सलामीवीरांनी पदार्पणवीर हर्षित राणाची चांगलीच धुलाई केली, ज्यामुळे हर्षित राणाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले. ज्यामुळे इंग्लंडने पहिल्या १० षटकात तीन विकेट्स गमावल्या.
पदार्पणात हर्षित राणाने टाकले सर्वात महागडे षटक –
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे हर्षित राणाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्णधार रोहितने डावातील सहावे षटक हर्षितकडे सोपवले. या षटकात फिल सॉल्टने पदार्पणवीर हर्षित राणाची धुलाई केली. या षटकात हर्षितने एकूण २६ धावा दिल्या. ज्यामध्ये राणाने ३ षटकार आणि २ चौकार मारले. वनडेमध्ये पदार्पण करताना भारतीय गोलंदाजाचे हे सर्वात महागडे षटक ठरले आहे.
हर्षित राणाचे जबरदस्त पुनरागमन –
याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना इतक्या धावा दिल्या नव्हत्या. याआधी हर्षितला टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये हर्षितने शानदार कामगिरी करत ३ विकेट्स घेतल्या. यानंतर हर्षित राणाने गोलंदाजीत शानदार पुनरागमन केले. हर्षितने एकाच षटकात २ विकेट्स घेत टीम इंडियासाठी शानदार पुनरागमन केले. दहाव्या षटकात हर्षितने हॅरी ब्रूक आणि बेन डकेटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात बेन डकेट ३२ आणि हॅरी ब्रूक खाते न उघडता बाद झाले.
हर्षित राणाला मिळाली तिसरी विकेट्स –
वेगवान गोलंदाज हर्षित राणाने तिसरी विकेट घेत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. १० चेंडूत पाच धावा करून बाद झालेल्या लियाम लिव्हिंगस्टोनला हर्षितने बाद केले. त्यामुळे इंग्लंडने १८३ धावांत सहा विकेट गमावल्या आहेत.