सध्या भारताचे दोन क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहेत. एक संघ एजबस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध निर्णायक कसोटी सामना खेळण्यात व्यग्र आहे तर टी २० संघ सराव सामने खेळत आहे. आयर्लंडविरुद्धची टी २० मालिका जिंकल्यानंतर तोच संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंड विरुद्धची तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू होण्यास आणखी वेळ असल्याने खेळाडूंना निवांत वेळ मिळाला आहे. या फावल्या वेळात भारतीय संघातील तीन खेळाडूंनी अनोखा खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारताचा तारांकित खेळाडू ईशान किशनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि स्वत: ईशान किशन मैदानाच्याकडेला बसलेले दिसत आहेत. गंमत म्हणजे ते बसून लहान मुलांचा एक खेळ खेळत आहेत. भारतीय संघातील हे तिन्ही धडाडीचे खेळाडू ‘चिड़िया उड़, मैना उड़’ खेळ खेळत आहेत.
हा खेळ खेळताना मध्येच हार्दिक पंड्या ईशान किशन आणि अक्षर पटेलला, ‘मैना म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारतो. त्यावर दोघेही भन्नाट उत्तरे देतात. ईशान किशन म्हणतो, ‘मैना उडणार पक्षी आहे’ तर अक्षर पटेल म्हणतो ‘मैना मोराची बहीण असते.’ त्यानंतर तिघेही जोरात हसताना दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ बघून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.