IND vs ENG ODI Series India Updated Squad: इंग्लंडविरूद्धच्या वनडे सामन्यासाठी भारताने संघात बदल करत सुधारित संघ ४ फेब्रुवारीला जाहीर केला. ज्यामध्ये टी-२० मालिकांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या वरूण चक्रवर्तीला संघात संधी देण्यात आली आहे. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बीसीसीआयने या मालिकेसाठी सुधारित संघ जाहीर करताना जसप्रीत बुमराहला संघातून वगळले आहे. ज्यामुळे त्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यावर प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध भारताच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे आता म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला १६ सदस्यीय संघातून वगळले आहे. बीसीसीआयने ४ फेब्रुवारीला एक निवेदन जारी केले. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताच्या सुधारित संघाची माहिती देण्यात आली. जसप्रीत बुमराहचे नाव या संघात नव्हते. बुमराहचे नाव संघात का दिले नाही, याबाबतही कोणतीही माहिती बीसीसीआयने दिली नाही.

टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, जसप्रीत बुमराह केवळ पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा भाग नसेल पण शेवटच्या वनडेसाठी तो उपलब्ध असेल. पण आता बुमराहचे संघात नाव वगळल्यानंतर चाहतावर्ग चिंतेत पडला आहे.

जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान पाठीत उसण भरल्यानंतर दुखापत झाली होती. जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. तेव्हा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी तो तंदुरुस्त होईल अशी व्यवस्थापनाला आशा आहे.

बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी वरुण चक्रवर्तीच्या संघात समावेशाबाबत अधिकृतपणे माहिती देणारे निवेदन जारी केले तेव्हा त्यात जसप्रीत बुमराहचा उल्लेख नव्हता. याशिवाय बीसीसीआयने बुमराहच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत अपडेट अद्याप दिलेली नाही. शिवाय तो चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा इंग्लंडविरूद्ध वनडे सामन्यात खेळणार की नाही याबाबतही कोणती अपडेट दिलेली नाही.

इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा , मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.