IND vs ENG Ranchi Test Match Updates : राजकोटमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने जसप्रीत बुमराहला रांची कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रांचीमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमार किंवा अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. मात्र, धरमशाला येथे होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह संघात परतणार आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात केएल राहुल परतण्याची शक्यता आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत राजकोटहून रांचीला जाणार नाही. जसप्रीत बुमराह राजकोटहून थेट अहमदाबादला रवाना होणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाणार नाही. जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण हाताळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेत ८०.५ षटके टाकली आहेत. त्याचबरोबर बुमराह या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत मालिकेत १७ विकेट्स घेतल्या आहेत.

बुमराहच्या जागी मुकेश कुमारला मिळणार संधी –

मात्र जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या मालिकेतील पाचही कसोटी सामने खेळणार नसल्याचे या मालिकेपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मोहम्मद सिराजला मालिकेतील दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आणि तो राजकोटला परतला. दुसऱ्या कसोटीनंतर मुकेश कुमारला संघातून मुक्त करण्यात आले. रांची येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी मुकेश कुमार संघात परतणार आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. मुकेश कुमार खेळत नसेल, तर संघ चार फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अशा स्थितीत अक्षर पटेलचे खेळणे निश्चित आहे.

हेही वाचा – IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल

केएल राहुलचे रांचीत पुनरागमन होण्याची शक्यता –

रोहित शर्माच्या संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनुभवी फलंदाज केएल राहुल पुढील सामन्यात खेळू शकतो. झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटीत राहुल पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्वाड्रिसेप्सच्या ताणामुळे राहुल दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत चमकलेल्या या स्टार फलंदाजाचा शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो राजकोटमधील सामन्यात खेळू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng jasprit bumrah will be rested from the test in ranchi and kl rahul is likely to make a comeback vbm
Show comments