IND vs ENG Jos Buttler most runs against India in T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला. या सामन्यात भारताने तिलक वर्माच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडचा २ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. दोन्ही सामन्यात फक्त कर्णधार जोस बटलर चमकला, ज्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात ४५ खेळी करत भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेपॉक स्टेडियमवर जोस बटलरने ३० चेंडूंचा सामना करताना २ चौकार आणि ३ षटकार मारत ४५ धावांची खेळी साकारली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूनी साथ मिळाली नाही. या खेळीसह तो तो भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जोस बटलरने आतापर्यंत भारताविरुद्धच्या २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ६०४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ५ अर्धशतके झळकावली आहेत.

बटलरने पूरनला टाकले मागे –

भारताविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० धावांचा आकडा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. बटलरच्या आधी भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता. पूरनने भारताविरुद्ध ५९२ धावा केल्या होत्या. आता बटलरने पूरनला मागे टाकले आहे.

भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:

जोस बटलर- ६०४ धावा
निकोलस पूरन- ५९२ धावा
ग्लेन मॅक्सवेल- ५७४ धावा
डेव्हिड मिलर- ५२४ धावा
ॲरॉन फिंच- ५०० धावा

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण –

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात जोस बटलरने ३ षटकार ठोकले. यासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण केले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने २०० षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे बटलरने २०११ मध्ये भारताविरुद्ध इंग्लंडकडून टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng jos buttler becomes first player to score 600 runs in t20 cricket against india vbm