IND vs ENG Kevin Pietersen statement on Virat and Rohit : इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने मंगळवारी सांगितले की, फॉर्ममध्ये नसलेला विराट कोहली आणि रोहित शर्मा सहानुभूती मिळण्यासाठी पात्र आहेत. कारण ते रोबोट नाहीत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दिलेला आनंद विसरू नये. कोहली आणि रोहित दोघेही फॉर्मशी झुंजत असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत १-३ पराभव पत्करावा लागला. त्यानंतर या दोघांच्या निवृत्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
केव्हिन पीटरसन काय म्हणाला?
केव्हिन पीटरसन एका कार्यक्रमात म्हणाला, “विराट-रोहितबद्द्ल जे बोलले जात आहे, हे योग्य नाही. ज्यांनी इतक्या धावा केल्या आहेत, त्यांनी तुम्ही निवृत्त कसे व्हावे हे कसे सांगू शकता? होय, हा एक चर्चेचा विषय आहे, जो मला समजतो. मात्र, ते यापेक्षा अधिक सन्मानासाठी पात्र आहेत.” पीटरसनचे ब्रिटीश माध्यमांशी प्रेम-द्वेषाचे नाते होते. त्यामुळे त्याला माहीत आहे की, या दोन्ही स्टार खेळाडूंना काय वाटत असेल. हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.
‘माझ्या कारकिर्दीत मलाही अशीच आव्हाने आली होती’-
पीटरसन म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत मलाही अशीच आव्हाने आली होती, असे घडते. रोहित आणि विराट हे रोबोट नाहीत. ते प्रत्येक वेळी फलंदाजी करताना शतक झळकावू शकत नाहीत. त्यांचा ऑस्ट्रेलियाचा दौरा खराब राहिला असेल. त्यामुळे ते वाईट लोक बनतात का? नाही. त्यामुळे ते वाईट क्रिकेटर बनतात का? अजिबात नाही. त्यामुळे लोकांनी पण समजून घेतले पाहिजे की, हे दोघंही माणसे आहेत. तुम्ही त्यांना निवृत्ती घ्यायला सांगत आहात. पण त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहता, ज्यावेळी ते खेळतं होते, तेव्हा तुम्हाला कसे वाटते होते? त्यांनी लोकांना आनंद दिला आहे.”
माजी कर्णधार पुढे म्हणाला, “हे सर्व आकडेवारीबद्दल नाही. हे सर्व जिंकणे किंवा हरणे याबद्दलही नाही. तुम्ही तुमची कारकीर्द तशीच पूर्ण करु शकता, जशी मी केली. मी खेळत असताना लोकांना कसे वाटत होते? याबद्दल लोक मला सांगतात. पीटरसन पुढे म्हणाला, “विराट लोकांना आश्चर्यकारक वाटतो. रोहित लोकांना आश्चर्यकारक वाटतो, म्हणून ते ३६, ३७ किंवा ३८ वर्षांचे असले तरीही खेळत आहेत. त्यामुळे मला नेहमी वाटते की अशा खेळाडूंचा आनंद साजरा केला पाहिजे.”