IND vs ENG Match Today: रविवारी लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक २०२३ सामन्याच्या आधी, भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरे होण्याच्या त्याच्या अनुभवाबद्दल खुलासा केला. याच मैदानावर राहुलला इंडियन प्रीमियर लीग दरम्यान हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. आता विश्वचषकातील भारताच्या सहाव्या सामन्यासाठी त्याच शहरात त्याच मैदानात उतरताना दुखापतीच्या आठवणी सुद्धा पुन्हा डोळ्यासमोर आल्याचे त्याने म्हटले आहे. आज होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या विश्वचषक सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना राहुलने या दुखापतीने पडसाद कसे त्याच्या आयुष्यावर उमटले याविषयी भाष्य केले आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असणाऱ्या राहुलला दुखापतीमुळे २०२३ चे आयपीएल सीझन अर्धवटच सोडावे लागले होते याबद्दल खेद व्यक्त करत तो म्हणाला की, “मै भूलना चाहता हूँ मगर लोग भूलने नहीं देते (मला ते विसरायचे आहे पण लोक मला त्याची आठवण करून देत आहेत). “काल जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा या मैदानाची माझी शेवटची आठवण म्हणजे – खाली पडून दुखापत. आशा आहे की, मी त्या कटू आठवणी बाजूला सारून ते सर्व विसरण्यासाठी काही चांगल्या आणि आनंदी आठवणी बनवू शकेन.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
WTC 2025 Final Dates Announced by ICC 11 to 15 June Lords Cricket Ground
WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

राहुल पुढे म्हणाला की, “दुखापतीने मला चार-पाच महिने खेळापासून दूर राहावे लागले. तो काळ कठीण होता. ज्याला दुखापत झाली आहे, तुम्ही अशा कोणाला विचारल्यास ते ही हेच संघातील शस्त्रक्रिया झाल्यावर पुन्हा नियमित आयुष्य जगताना खूप मेहनत घ्यावी लागते, खूप संयम लागतो आणि हे अजिबात सोपे नाही.”

हे ही वाचा<< पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या केशव महाराजने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिली अशी ओळ की.. भारतीय झाले फॅन्स, पाहा

टीम इंडिया रविवारी २०२३ च्या विश्वचषकाच्या लढतीत इंग्लंड संघाचा सामना करणार आहे. सध्या पाकिस्तानला मात देऊन दक्षिण आफ्रिका सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. आजचा सामना जिंकून या स्थानी पुन्हा पोहोचण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. भारत विश्वचषकाच्या मोहिमेत अपराजित आहे तर फॉर्म हरवलेल्या जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आतापर्यंत पाच सामन्यांत केवळ एक विजय मिळवून विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.