गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे १ जुलै ते ५ जुलै याकाळात दोन्ही संघादरम्यान शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अप्टॉनस्टील काउंटी मैदानावर एक चार दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. या सराव सामन्यात इंग्लंडच्या २१ वर्षीय रोमन वॉकरने भारतीय दिग्गजांच्या नाकी नऊ आणले. रोमनने ११ षटकात अवघ्या २४ धावा देत भारतीय संघातील पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अगदी विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजासारखे कसलेले आंतरराष्ट्रीय खेळाडूदेखील रोमनसमोर टिकू शकले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजी क्रमवारींपैकी एक समजल्या जाणाऱ्या भारतीय फलंदाजीला अडचणीत आणण्याचे काम २१वर्षीय रोमनने केले आहे. २०१९च्या सुरुवातीला वयाच्या १८व्या वर्षी त्याने ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला टी-२० ब्लास्टमध्ये तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने पाच बळी घेतले मात्र, त्या तुलनेत त्याने बऱ्याच धावा दिल्या होत्या.

सुमारे सहा फूट तीन इंच उंची असलेला हा गोलंदाज वेल्सचा रहिवासी आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला तो आपला आदर्श मानतो. २०१८मध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला होता. तिथे त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

हेही वाचा – Ranji Trophy Final 2022 : “ते नसते तर मी कधीच…”, सर्फराज खानने ‘या’ व्यक्तीला दिले यशाचे श्रेय

२०२१मध्ये रोमन वॉकरला लिसेस्टरशायरने करारबद्ध केले. भारता विरुद्धच्या सराव सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आला. संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास योग्यच असल्याचे त्याने सिद्ध करून दाखवले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी चहापानापर्यंत त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांचे बळी मिळवले.

दरम्यान, अवघ्या २१ वर्षीय वेगवान गोलंदाजाने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या चिंतेत भर पडली आहे. इंग्लंडचा कसोटी संघ सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. अशा स्थितीमध्ये भारतीय फलंदाजीचा निभाव लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.