भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे शुक्रवारपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. मात्र संघातील सर्व खेळाडूंच्या करोना (आरटी-पीसीआर) चाचण्यांचे अहवाल नकारात्मक मिळाल्यामुळे सामना होण्याची शक्यता बळावली आहे. असं असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री भारतीय संघातील खेळाडूंनी घेतलेल्या बैठकीमध्ये कसोटी खेळण्यासंदर्भात खेळाडूंना रस नसल्याचं आणि करोना संसर्गाची भीती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी मैदानामध्ये उतरण्यास नकार दिला तर इंग्लंडला हा सामना बहाल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून (ईसीबी) या सामन्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. म्हणूनच भारताने माघार घेतली तर इंग्लंडला विजयी घोषित केलं जाण्याची मागणी ईसीबीने याआधीच केलीय. म्हणूनच आता तीन वाजता भारतीय खेळाडू आणि बीसीसीआय काय निर्णय घेणार यावर मँचेस्टर कसोटीचं भवितव्य अवलंबून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा