भारतीय क्रिकेट संघ हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टी२० मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळण्यात येणार आहे. आणि या मालिकेनंतर एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधीच भारताला एक धक्का बसला आहे.

टी२० मालिकेत सहभागी होऊ न शकलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा वन-डे मालिकेतून बाहेर झाला आहे. बुमरावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याला या मालिकेत सहभागी होता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ”भारतीय संघनिवड समितीने बुमराच्या जागी शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे. बुमरावर ४ जुलै २०१८ रोजी लीड्स येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो मायदेशी परतला. त्याच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीच्या देखरेखीखाली तो तंदुरुस्त होईल”, अशी माहिती बीसीसीआयने परिपत्रकाद्वारे दिली.

Story img Loader