IND vs ENG ODI Match Live streaming Details: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरूद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सराव असणार आहे. भारत आणि इंग्लंड ६ फेब्रुवारी (गुरुवार) ते १२ फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील. सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यावर असतील. गेल्या काही कसोटी मालिकेत या दोन्ही खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली नव्हती. हे सामने भारतात कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घ्या.

टी-२० मालिकेत भारताकडून ४-१ अशा पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर वनडेमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत मैदानात उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारखे वरिष्ठ खेळाडू ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणार असल्याने यजमान संघात मोठे बदल पाहायला मिळतील. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठीही ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने श्रीलंकेत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ५८ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले असून तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील. तर नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. भारत वि इंग्लंड मालिका टीव्हीवर दोन विविध स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. स्पोर्ट्स 18 आणि स्टार स्पोर्ट्स या दोन चॅनेलवर ही मालिका लाईव्ह पाहता येईल. तर मोबाईल अॅपवर डिस्नी प्लस हॉटस्टावर या मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.


IND Vs ENG ODI Match Live streaming Details: भारत वि इंग्लंड तीन सामन्यांच्या वनडे मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार, जाणून घ्या.
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशीद, मार्क वुड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng odi series live streaming details how to watch india vs england 1st odi match bdg