IND vs ENG T20I Series: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाने पूर्वीच संघ जाहीर केला आहे. पण आता इंग्लंड संघाच्या नव्या गोलंदाजाला भारताचा व्हिसा मिळालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडच्या ताफ्यात वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संधी मिळाली आहे. तो पहिल्यांदाच भारताविरूद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला असतानाच या मालिकेसाठी त्याला अद्याप व्हिसा मिळालेला नाही. भारतीय दूतावासाने अद्याप या खेळाडूला व्हिसा न दिल्याने ही समस्या उद्भवली आहे. साकिब हा पाकिस्तानी वंशाचा खेळाडू असल्याने इंग्लंडला हा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Wankhede Stadium: ५ किलो तांदूळ, मिक्सरपासून ते कंगवा अन् टोपीही…, वानखेडेच्या पन्नाशीनिमित्त ग्राऊंडसमॅनचा MCA ने असा केला अनोखा सत्कार

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, महमूद इंग्लंडमध्ये ट्रेनिंग करू शकत नाहीय कारण तिथे खूप थंडी आहे. यामुळे ECB ने युएईमध्ये वेगवान गोलंदाजी शिबिर आयोजित केले आहे. दरम्यान, गस ऍटकिन्सन, ब्रेडन कार्स, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर या शिबिरासाठी रवाना झाले आहेत. इंग्लंडचा संघ १७ जानेवारीला भारतात येऊ शकतो. महमूद आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ईसीबीने अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.

हेही वाचा – टीम इंडियाला मिळणार नवा फलंदाजी प्रशिक्षक? गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह, BCCI मोठा निर्णय घेणार

साकिब महमूद हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटर असून त्याचा जन्म १९९७ साली झाला. साकिबला २०१९ मध्ये देखील अशीच अडचणी आल्या होत्या जेव्हा तो इंग्लंड संघाबरोबर दौरा करू शकला नव्हता. इंग्लंडचा भारत दौरा २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वेगवान गोलंदाजाला वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाले आहे.

हेही वाचा – VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…

शोएब बशीर आणि रेहान अहमदलाही झालेली व्हिसाची अडचण

यापूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजांना सारख्याच अडचणीला सामोरं जावं लागलं होतं. शोएब बशीरही भारत दौऱ्यापूर्वी यूएईमध्ये अडकला होता. त्यालाही व्हिसाच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे तो हैदराबादमधील सलामीचा सामना चुकला होा आणि दुसऱ्या कसोटीत त्याने पदार्पण केले. रेहान अहमदकडे सिंगल एंट्री व्हिसा असल्याने त्यालाही राजकोट विमानतळावर थांबवण्यात आले होते. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. व्हिसाची समस्या मिटल्यानंतर वैयक्तिक कारणामुळे त्याने संघातून आपले नाव मागे घेतले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng pakistani origin england bowler saqid mahmood denied visa to india ahead of white ball series bdg