IND vs ENG 3rd T20I R Ashwin on X post : भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणाऱ्या इंग्लंड संघावर निशाणा साधला आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडचा संघ पराभूत झाला होता आणि तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडने पराभवाचे नशीब स्वतःच लिहिले होते. मात्र, राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात भारताची फलंदाजी खराब झाली होती. अशा परिस्थितीत इंग्लंडने विजय मिळवला, पण आर अश्विनने सामन्याच्या मध्यावर इंग्लंड संघावर निशाणा साधला आणि आक्रमक आणि निष्काळजी क्रिकेटमध्ये थोडा फरक आहे, असा सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर अश्विन काय म्हणाला?

“आक्रमक क्रिकेट खेळणे आणि बेफिकीर क्रिकेट खेळणे यात खूप बारीक रेषा आहे,” असे आर अश्विनने एक्सवर इंग्लंडच्या डावाच्या मध्यावर पोस्ट केली होती. अश्विनचा स्पष्ट अर्थ असा होता की, आक्रमक क्रिकेट खेळण्याऐवजी तुम्ही बेफिकीर क्रिकेट खेळत नाही, याकडे लक्ष द्या, कारण इंग्लंड संघाचा प्रत्येक फलंदाज फक्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता. ते कोणत्याही गोलंदाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असले तरी, तुम्हाला सामन्याची परिस्थिती आणि गोलंदाजी समजून घ्यावी लागेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

या टी-२० मालिकेत इंग्लंडचा संघ सतत तीच चूक करत होता. ते वरुण चक्रवर्तीच्या षटकात आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद होत होते. त्याने तीन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. हॅरी ब्रूकसारखा फलंदाज फिरकी गोलंदाजीवर आक्रमण करताना पुन्हा पुन्हा आऊट होत आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न करताना इतर फलंदाजही बाद होत आहेत, पण भारतीय फलंदाज परिस्थितीनुसार फलंदाजी करत सामने जिंकत आहेत. मात्र, राजकोटमध्ये इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत स्वत:ला जिवंत ठेवले. चौथा सामना ३१ जानेवारीला पुण्यात होणार आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये बेन डकेटने सर्वाधिक ५१ धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टनने ४३ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ५ तर हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. भारतीय संघ१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ बाद १४५ धावाच करु शकला. ज्यामुळे भारताला २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतासाठी हार्दिक पंड्याने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. इंग्लंडसाठी जेमी ओव्हर्टनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng r ashwin on england team there is a very fine line between playing aggressive brand of cricket and reckless cricket vbm