IND vs ENG Rohit Sharma surpasses Rahul Dravid and Chris Gayle : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली. या सामन्यात त्याने राहुल द्रविडसह ख्रिस गेलला मागे टाकले. त्याने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. त्याचबरोबर तो आता भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर हिटमॅन आता एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात त्याने राहुल द्रविड आणि ख्रिस गेल यांना हरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा चौथा भारतीय खेळाडू ठरला –

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याने १८४२६ धावा केल्या आहेत. याशिवाय विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात १३,९०६ धावा केल्या आहेत. सौरव गांगुली यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ११३६३ धावा केल्या आहेत. आता रोहित शर्मा चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर आता १०८९४ धावा आहेत. त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे, ज्याने १०८८९ धावा केल्या आहेत.

भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारे खेळाडू :

१८,४२६ – सचिन तेंडुलकर
१३,९०६ – विराट कोहली
११,३६३ – सौरव गांगुली
१०८९४* – रोहित शर्मा
१०,८८९ – राहुल द्रविड

त्याचबरोबर, या सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलच्या नावावर ३३१ षटकार होते. तर रोहितने या सामन्यात ३ षटकार मारून ख्रिस गेलचा विक्रम मोडला. आता रोहित ३३२ षटकारांसह एकदिवसीय स्वरूपात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू :

३५१ शाहिद आफ्रिदी<br>३३२ रोहित शर्मा*
३३१ ख्रिस गेल
२७० सनथ जयसूर्या
२२९ एमएस धोनी
२२० ओएन मॉर्गन