IND Vs ENG 3rd ODI Updates in Marathi: रोहित शर्माने दणक्यात पुनरागमन केलं आणि तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार स्वस्तात माघारी परतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिले सलग दोन सामने जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली असून आता मालिकेत एकतर्फी विजय मिळवण्यावर संघाचा जोर असेल. पण प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला सामना सुरू होताच रोहित शर्माच्या विकेटच्या रूपात मोठा धक्का बसला.
इंग्लंडने वनडे मालिकेत सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर धाव घेतली. यानंतर दुसऱ्या षटकात मार्क वुडला गोलंदाजीची जबाबदारी दिली. वुडने षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहितला चकमा दिला आणि चेंडू खेळायला भाग पाडलं. रोहितने बॅट पुढे केली आणि तितक्याच बॅटची कड घेत चेंडू विकेटच्या मागे पोहोचला आणि फिल सॉल्टने अवघ्या काही क्षणांत उजव्या बाजूला हवेत झेप घेत झेल टिपला आणि रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने बाद होण्यापूर्वी फक्त २ चेंडूत १ धाव घेतली होती.
रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत ११९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मोठ्या प्रतिक्षेनंतर रोहित शर्मा फॉर्मात परतला होता. आपल्या जुन्या हिटमॅन अंदाजात रोहित शर्माने फटकेबाजी करत शतक झळकावले.
IND vs ENG तिसऱ्या वनडे सामन्यासाठी कशी आहे भारताची प्लेईंग इलेव्हन?
इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यांच्या जागी कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली आहे. शमी आणि जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर वरूण चक्रवर्तीच्या पायाच्या पोटरीला दुखापत असून तो या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.
इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.
Rohit sharma wicket clip?? pic.twitter.com/cRS7WBzNXg
— Vishesh? (@Vishesh_45_) February 12, 2025
भारतविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (सी), टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.