IND Vs ENG 4th T20I Updates in Marathi: भारत वि इंग्लंड चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघावर पहिल्यांदाच वाईट वेळ ओढवली. भारतीय संघाने अवघ्या २ षटकांत तीन विकेट्स गमावले होते. यामागे कारण ठरला इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज शाकिब महमूद. मूळ पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या या खेळाडूने दुसऱ्या षटकात ३ विकेट्स घेत एकही धाव न देता भारतीय फलंदाजी फळीला सुरूंग लावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या टी-२० साठी बटलरने नाणेफेकीनंतर आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. स्मिथच्या जागी बेथेलला संधी मिळाली, तर मार्क वुडच्या जागी साकिब महमूदचा समावेश करण्यात आला. साकीबला संघात आणण्याचा बटलरचा निर्णय योग्य ठरला.

भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?

जोफ्रा आर्चरने पहिल्या षटकात १२ धावा दिल्या. पुढच्याच षटकात साकिब महमूदकडे चेंडू सोपवला आणि त्याने चमत्कार केला. संजू सॅमसनला शॉर्ट बॉल टाकत टाकला आणि सॅमसन ब्रायडन कार्सकरवी सीमारेषेजवळ झेलबाद झाला. यानंतर षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर महमूदने तिलक वर्मालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवला त्याने ३ चेंडूवर एकही धाव करण्याची संधी दिली आणि अखेरच्या चेंडूवर सापळा रचत त्याला झेलबाद केलं.

इंग्लंडच्या ताफ्यात वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संधी मिळाली होती. तो पहिल्यांदाच भारताविरूद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला असतानाच या मालिकेसाठी त्याला सुरूवातीला व्हिसा मिळालेला नव्हता.साकिब हा पाकिस्तानी वंशाचा खेळाडू असल्याने त्याला इतर खेळाडूंच्या तुलनेत लगेच व्हिसा मिळाला नव्हता. साकिब महमूद हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटर असून त्याचा जन्म १९९७ साली झाला. साकिबला २०१९ मध्ये देखील अशीच अडचणी आल्या होत्या जेव्हा तो इंग्लंड संघाबरोबर दौरा करू शकला नव्हता.

साकिब महमूद उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने २०१९ मध्ये टी-२० आणि २०२० मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो त्याच वर्षी कसोटी सामनेही खेळला. साकिब महमूदने २ कसोटीत ६ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर टी-२० मध्ये २१ विकेट आहेत. साकिब महमूद हा इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीमुळे ओळखला जातो. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याचे कौशल्य आहे. याशिवाय तो चेंडू रिव्हर्स स्विंगही शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng sakib mahmood 3 wickets with maiden over sanju samson tilak varma suryakumar yadav in 4th t20i bdg