ओव्हलच्या खेळपट्टीवर गुरुवारी वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शार्दूल ठाकूरच्या (३६ चेंडूंत ५७ धावा) धडाकेबाज अर्धशतकानंतरही इंग्लंडच्या वेगवान चौकडीपुढे भारताचा पहिला डाव १९१ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही भेदक मारा करून पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी अवस्था केली. अर्थात पहिला दिवस गोलंदाजांचा राहिला असला तरी शार्दूल ठाकूरची जलद खेळी भाव खाऊन गेली. विशेष म्हणजे या वेगवान खेळीमध्ये शार्दूलने दोन विक्रम स्वत:च्या नावावर केलेत.
शार्दूल ठाकूरने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. म्हणजेच या ५३ धावांपैकी ४६ धावा या चौकार, षटकारांमधून आल्या. शार्दूलने रॉबिनसनच्या चेंडूवर षटकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने केवळ ३१ चेंडूंमध्ये ५० धावांचा पल्ला गाठला. हे इंग्लंडमधील कोणत्याही मैदानावर कोणत्याही देशाच्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. शार्दूलच्या आधी इयान बॉथमच्या नावावर हा विक्रम होता. त्याने १९८६ मध्ये ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. बॉथमने ही खेळी न्यूझीलंडच्या संघाविरोधात केली होती. विशेष म्हणजे ही दोन्ही वेगवान अर्धशतकं ओवलच्या मैदानात झालीयत. भारतीय संघाबद्दल बोलायचं झाल्यास हे कोणत्या भारतीय खेळाडूने केलेलं दुसरं सर्वात वेगवान कसोटी अर्थशकत आहे. सर्वात जलद अर्थशतक करण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. वेगवान कसोटी अर्थशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत शार्दूलने दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.
कपिल देव यांनी १९८२ मध्ये पाकिस्तानविरोधात खेळताना अवघ्या ३० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कपिल यांनी याच वर्षी इंग्लंविरोधात खेळताना ३३ चेंडूंमध्येही अर्धशतक झळकावलं होतं. यापूर्वी ३३ चेंडूंमध्ये १९७८ साली कपिल देव यांनी पाकिस्तानविरोधात वेगवान शतक झळकावलं होतं. कपिल देव यांच्या व्यतिरिक्त वीरेंद्र सेहवागने २००८ मध्ये इंग्लंडविरोधात ३२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.
शार्दूलने १५८.३३ च्या सरासरीने ५७ धावा केल्या. ही कोणत्याही भारतीय फलंदाजाने वेगवाने (किमान ५० धाव गृहित धरल्यास) केलेली दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. कपिल देव यांनी १९८२ साली इंग्लविरोधात १६१.८१ च्या सरासरीने अर्धशकत झळकावलं होतं. तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग असून त्याने २००२ साली इंग्लडविरोधात १४५.९४ च्या सरासरीने ५० धावा केल्या होत्या. या यादीत मोहम्मद अजहरुद्दीन चौथ्या स्थानी असून त्याने १४१.५५ च्या सरासरीने अर्थशतक झळकावलं होतं.