IND vs ENG Shubman Gill scores seventh ODI century : शुबमन गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले. शुबमन गिलचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे ७ वे शतक आहे. भारतीय सलामीवीराने ९५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने त्याच्या १४ चौकार आणि २ षटकार मारले असून १०२ धावांवर नाबाद आहे. या शतकी खेळीदरम्यान शुबमन गिलने एक मोठा विश्वविक्रमही मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुबमन गिलने विश्वविक्रमही मोडला –

भारतासाठी ५० वा एकदिवसीय सामना खेळताना गिलने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण केल्या. यासह, गिलने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद २५०० धावा करण्याचा विश्वविक्रम मोडला. हा विश्वविक्रम यापूर्वी हाशिम आमलाच्या नावावर होता. अमलाने ५१ एकदिवसीय डावांमध्ये २५०० धावा करण्याचा विक्रम केला होता. आता हा गिलच्या नावावर एक जागतिक विक्रम बनला आहे. शुबमन गिलने भारतासाठी ५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ६१ पेक्षा जास्त सरासरीने २५७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

सर्वात जलद २५०० एकदिवसीय धावा पूर्ण करणारे खेळाडू (डाव) :

  • ५० – शुबमन गिल (भारत)
  • ५१ – हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
  • ५२ – इमाम उल हक (पाकिस्तान)
  • ५६ – व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)
  • ५६ – जोनाथन ट्रॉट (इंग्लंड)

शुबमन गिल सातवा भारतीय फलंदाज ठरला –

टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर के. श्रीकांत आहेत, ज्यानी १९८२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही खास कामगिरी केली होती. या यादीत त्यांच्यानंतर अनुक्रमे दिलीप वेंगसकर, मोहम्मद अझरुद्धीन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर के. श्रीकांत यांच्यानंतर मायदेशात हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.