IND vs ENG 1st ODI Axar Patel clean bowled video viral : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना नागपुरात खेळला गेला. टीम इंडियाने या सामन्यात ४ विकेट्सनी शानदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतके झळकावली. त्याचवेळी, इंग्लंडचा महान फिरकी गोलंदाज आदिल रशीदच्या अत्यंत जबरदस्त इन-स्विंग चेंडूवर अक्षर पटेल क्लीन बोल्ड झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिल रशीदच्या इन-स्विंग चेंडूवर अक्षर पटेलचा क्लीन बोल्ड पाहून नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनेही डोक्याला हात लावला. ही घटना ३४व्या षटकात घडली. अक्षर पटेल ५७ धावांवर फलंदाजी करत असताना त्याच्यासमोर आदिल रशीद होता. आदिल रशीदने इतका जबरदस्त इन-स्विंग चेंडू टाकला, ज्याने अक्षर पटेलच्या दांड्या गुल केल्या. हे पाहून शुबमन गिलही चकित झाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सामन्यात अक्षर पटेलने ५७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान अक्षरने ६ चौकार आणि १ चौकार लगावला.

आदिल रशीदने घेतल्या २ विकेट्स –

या सामन्यात अक्षर पटेलने ५७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान अक्षरने ६ चौकार आणि १ चौकार लगावला. या सामन्यात आदिल रशीदने चांगली गोलंदाजी केली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. या सामन्यात गोलंदाजी करताना आदिल रशीदने १० षटकात ४९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने केएल राहुल आणि अक्षर पटेल यांची विकेट्स घेतली.

भारताने मालिकेला विजयाने केली सुरुवात –

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे गुरुवारी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४७.४ षटकात सर्वबाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३८.४ षटकांत ६ गडी गमावत २५१ धावा केल्या आणि सामना जिंकला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सात एकदिवसीय सामने गमावले आहेत. आता टीम इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून अजेय आघाडी घेण्याकडे लक्ष देईल. हा सामना ९ फेब्रुवारीला कटक येथे खेळवला जाणार आहे.