पहिल्या कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडने ३१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विराट कोहलीने दमदार फलंदाजी करताना पहिल्या डावात १४९ आणि दुसऱ्या डावात ५१ धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. विराट कोहलीने एकाकी झुंज देत सामन्यात रंगत निर्माण केली. पण कोहलीला अन्य फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे सामन्यात भारताला पराभव पहावा लागला. त्यानंतर अनेक दिग्गजांनी विराट कोहलीच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पुढील कसोटीत संघात बदल करण्याचा सल्ला दिला. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटला संघात बदल न करण्याचा सल्ला दिला आहे. नेहमी अंतिम अकरामध्ये बदल केल्यामुळे खेळाडूंच्या मनात भीती असते की एवढ्या वर्षांनंतरही व्यवस्थापनाचा विश्वास जिंकण्यात आपण अपयशी ठरत आहोत. अंतिम अकरात बदल नको. उलट, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी, असे मत त्याने व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा