४ डावात ६९ धावा. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची ही सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरी आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय कर्णधार लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात ७ धावांवरही बाद झाला. इंग्लंडमध्ये कोणत्याही फलंदाजाला धावा काढण्यात अडचणी येतात, पण विराट ज्या प्रकारे बाद होत आहे, तो खूप चिंतेचा विषय आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटला दिग्गज क्रिकेटपटू सचिनची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. विराट कोहली बाद होताच गावसकर म्हणाले, की भारतीय कर्णधाराने ताबडतोब सचिनला फोन करून त्याच्याकडे मदत मागितली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लीड्स कसोटीत समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले, ”विराट कोहलीला लगेच सचिनला फोन करावा लागेल आणि मी काय करावे? असे त्याला विचारावे लागेल. सचिनने सिडनी कसोटीत जे केले तेच विराटने करायला हवे. मी कव्हर ड्राइव्ह खेळणार नाही, हे विराटने स्वत: ला सांगायला हवे.” विराट कोहली मालिकेत दुसऱ्यांदा जेम्स अँडरसनचा बळी ठरला. अँडरसनच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातात विसावला.

हेही वाचा – ENG vs IND : लाजिरवाणी फलंदाजी; तब्बल ४७ वर्षानंतर टीम इंडिया पुन्हा ठरली ‘फ्लॉप’!

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सातव्यांदा बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विराट कोहलीला बाद करण्याच्या बाबतीत जेम्स अँडरसनने आता नॅथन लायनशी बरोबरी केली आहे.

गावसकर म्हणाले, ”माझ्यासाठी ही चिंतेची बाब आहे, कारण तो पाचव्या, सहाव्या आणि सातव्या यष्टीच्या चेंडूंवर बाद होत आहे. २०१४ मध्येही तो ऑफ-स्टंपवर बाद होत होता. २००३-०४मध्ये ४३६ चेंडूंच्या डावात सचिनने एकही कव्हर ड्राइव्ह मारला नव्हता. कव्हर ड्राईव्ह हा विराट कोहलीचा आवडता शॉट आहे, पण इंग्लंडमध्ये हा शॉट त्याला तंबूत पाठवत आहे.”