भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. मालिकेतील तिसरा सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती झाला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा १७ धावांनी पराभव केला. असे असली तरी भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवने केलेली शतकी खेळी हे तिसऱ्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यजमान इंग्लंडने भारताला विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मात्र, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. दोघांनी मिळून पाचव्या शतकी भागीदारी केली.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने अवघ्या ४८ चेंडूत शतक झळकावले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय ठरला आहे. तर, चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ५५ चेंडूत १४ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ११७ धावांची अप्रतिम खेळी केली.

हेही वाचा – Ind vs Eng 3rd T20 : इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली; ट्रेंट ब्रिजवर भारताला स्वीकारावा लागला पराभव

सूर्यकुमार यादवने भारतीय संघ संकटात असताना दमदार खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याच्या खेळीमुळेच भारताला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याच्या या कामगिरीसाठी तो बाद झाल्यानंतर भारतीय प्रेक्षकांसोबतच इंग्लंडच्या प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.