भारताचा इंग्लंड दौरा मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील घडामोडींसाठी देखील चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या माजी खेळाडूंनी जोरदार प्रतिक्रिया देण्याचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा विषय आला म्हणजे त्यात वसिम जाफर आणि मायकल वॉन ही जोडी नेहमीच आघाडीवर असते. आता देखील वसिम जाफरने मायकल वॉनची खिल्ली उडवली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर जाफरने ट्वीट करून आपल्या ‘ट्विटर शत्रू’ची मजेशीर पद्धतीने विचारपूस केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामनादेखील भारताने जिंकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान संघाला १२१ धावांतच गुंडाळले. त्यानंतर भारताचा माजी खेळाडू वसिम जाफरने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट करून मायकल वॉनची विचारपूस केली आहे.

जाफरने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मूल शिट्टी वाजवताना दिसत आहे. “आशा आहे की सर्व ठीक आहे मायकल वॉन”, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. जाफरचा हा व्हिडीओ भारतीय चाहत्यांना फार आडवला असून अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा – Wimbledon 2022 Men’s Final : सेंटर कोर्टचा बादशाह कोण? नोव्हाक जोकोविच आणि निक किर्गिओसमध्ये रंगणार ‘महामुकाबला’

मायकल वॉनच्या ट्वीटरवरील कुरापतींना माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर कायम जोरदार प्रत्त्युतर देतो. एजबॅस्टन कसोटीतदेखील इंग्लंडच्या विजयानंतर जाफरने वॉनवर निशाणा साधला होता. यावेळी भारताच्या विजयानंतर जाफरने वॉनला अजिबात दया दाखवली नाही.

Story img Loader