इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यामध्ये टीम इंडियानं पाहुण्यांसमोर विजयासाठी १८६ धावांचं मोठं आव्हान ठेवलं. यामध्ये भारताचा मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं पदार्पणाच्या सामन्यातच झळकावलेल्या तडाखेबाज अर्धशतकाचा समावेश होता. पण सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाइतकीच तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्याची देखील मोठी चर्चा आता नेटिझन्समध्ये पाहायला मिळत आहे. डेविड मलाननं पकडलेला सूर्यकुमार यादवचा झेल मैदानाबाहेर बसलेल्या टीम इंडियासोबतच आपापल्या घरी ट्वीटरवर बसलेल्या नेटिझन्सना देखील पटला नाही. त्यावरूनच ट्वीटवर #notout #umpiring #thirdumpire असे ट्वीटर ट्रेंड दिसू लागले आहेत.

नेमकं झालं काय?

झंझावाती अर्धशतक पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव भारताचा स्कोअरबोर्ड वेगाने पुढे घेऊन जाईल, असं वाटत असतानाच सॅम करनच्या गोलंदाजीवर वैयक्तिक ५७ धावांवर असताना सूर्यकुमार यादवचा अप्रतिम झेल डेविड मलाननं पकडला. मात्र, यावेळी मलानच्या हातातून चेंडू मैदानाला लागल्याचं मोठ्या स्क्रीनवर दिसत होतं. मात्र, नेमक्या त्याच वेळी मलानची बोटं चेंडूच्या खाली होती की नाही, यावर थर्ड अंपायर देखील खात्रीशीर निर्णयाप्रत येऊ शकले नाहीत. पण मैदानावरील अंपायरने बाद दिल्यामुळे थर्ड अंपायरने देखील सूर्यकुमार यादवला बाद दिलं. एका ट्वीटर युजरने याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

 

या निर्णयावर नेटिझन्ससोबतच अनेक आजी-माजी खेळाडूंनी ट्वीटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनं तर थर्ड अंपायरवरच एक मीम पोस्ट केलं आहे!

 

तर वासिम जाफरनं यावर थेट आयसीसीलाच प्रश्न विचारला आहे.

 

आपली नाराजी व्यक्त करण्यात अभिनेता फरहान अख्तर देखील मागे नाही राहिला.

 

दरम्यान अनेक नेटिझन्सनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

 

 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता सॉफ्ट डिस्मिसल, थर्ड अंपायर आणि त्यांच्याद्वारे घेतले जाणारे निर्णय, यावर मोठी चर्चा होऊ लागली आहे.

Ind vs Eng T20 : पदार्पणातच सूर्यकुमारचं दमदार अर्धशतक! ५७ धावांची झंझावाती खेळी!