IND vs ENG T20I Series Schedule in Marathi: भारतीय संघ नव्या वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर टीम इंडिया नवीन वर्षात घरच्या मैदानावर पहिली मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी ही महत्त्वाची मालिका असेल. टीम इंडियाने भारतीय वेळेनुसार पहाटे ऑस्ट्रेलियात बहुतेक सामने खेळले होते, परंतु आता संध्याकाळी घरच्या मैदानावर त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड T20I मालिकेतील सर्व सामने कधी, कुठे आणि कोणत्या वेळी खेळले जातील, याचा आढावा घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका २२ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. संघाचा पहिला सामना कोलकाता येथे होणार आहे. शेवटचा सामना २ फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. तर टी-२० मालिकेनंतर भारताला इंग्लंडविरूद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज

भारत वि. इंग्लंड टी-२० मालिकेचे पूर्ण वेळापत्रक (IND vs ENG T20I Series Schedule)

भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-२०: २२ जानेवारी २०२५, कोलकाता (ईडन गार्डन्स)

भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी टी-२०: २५ जानेवारी २०२५, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)

भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-२०: २८ जानेवारी २०२५, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)

भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी-२०: ३१ जानेवारी २०२५, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)

भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी-२०: ०२ फेब्रुवारी २०२५, मुंबई (वानखेडे स्टेडियम)

हेही वाचा – Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर

किती वाजता सुरू होणार भारत वि इंग्लंड टी-२० सामने?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला २२ जानेवारीपासून कोलकाता येथे सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा सामना चेन्नईत होणार आहे. तिसरा सामना राजकोटमध्ये तर चौथा सामना पुण्यात होणार आहे. मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना मुंबईत होणार आहे. इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेतीस सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. तर नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल.

हेही वाचा – भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ

इंग्लंडचा संघ

हॅरी ब्रूक, बेन डकेट, जॅकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोस बटलर, जेमी स्मिथ, फिलिप सॉल्ट, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng t20i series full schedule timings and squads in detail india england bdg