India vs England 1st T20I: इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उद्या म्हणजेच २२ जानेवारीपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला टी-२० सामना कोलकाता येथील ऐतिहासिक क्रिकेट मैदान ईडन गार्डन येथे खेळवला जाईल. तीन वर्षांनंतर ईडन गार्डनमध्ये टी-२०सामना आयोजित केला जात आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील या टी-२० मालिकेतील सामने कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रथम ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिकादेखील खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. भारताच्या टी-२० संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. तर अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार आहे.

भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. स्टार स्पोर्टसच्या सर्व चॅनेलवर भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचे सामने पाहायला मिळणार आहेत. तर या मालिकेतील सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

किती वाजता सुरू होणार भारत वि इंग्लंड पहिला टी-20 सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवले जातील. याच्या अर्धा तास आधी म्हणजे ६.३० वाजता नाणेफेक होईल. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील.

भारत वि. इंग्लंड टी-२० मालिकेचे पूर्ण वेळापत्रक (IND vs ENG T20I Series Schedule)

भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-२०: २२ जानेवारी २०२५, कोलकाता (ईडन गार्डन्स)

भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी टी-२०: २५ जानेवारी २०२५, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)

भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-२०: २८ जानेवारी २०२५, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)

भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी-२०: ३१ जानेवारी २०२५, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)

भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी-२०: ०२ फेब्रुवारी २०२५, मुंबई (वानखेडे स्टेडियम)

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ

इंग्लंडचा संघ

हॅरी ब्रूक, बेन डकेट, जॅकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोस बटलर, जेमी स्मिथ, फिलिप सॉल्ट, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng t20i series live streaming details how to watch india england 1st t20 match bdg